Marathi Sahitya Sammelan | नवी दिल्लीत ९८ व्या साहित्य संमेलनासाठी स्थळ पाहणी

७० वर्षानंतर होणार साहित्य संमेलन
98 th Marathi  Sahitya Sammelan
मराठी साहित्य संमेलनासाठी स्थळ निवड समितीने नवी दिल्ली येथील नियोजित स्थळाची पाहणी केली. Pudhari News Network
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९८ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी स्थळ निवड समितीने गुरुवारी नवी दिल्ली येथील नियोजित स्थळाची पाहणी केली. समितीने दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल संस्था सभागृह तसेच तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे भेट दिली. या स्थळांसह निवास व्यवस्थेच्या दृष्टीनेही काही ठिकाणांची पाहणी समितीने केली. (Marathi Sahitya Sammelan)

98 th Marathi  Sahitya Sammelan
Nashik News | दिल्ली दुर्घटनेवरुन धडा; तरीही तळघरांच्या सर्वेक्षणासाठी कागदी घोडे

या मान्यवरांनी केली पाहणी

यावेळी महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. उषा तांबे, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह डॉ. उज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, सदस्य प्रदीप दाते, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. सुनिता राजे पवार उपस्थित होत्या. तसेच याप्रसंगी निमंत्रक सरहद्द संस्थेचे संजय नहार, विजय नाईक, अतुल जैन, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे, डॉ. शैलेश पगारिया, श्रीराम जोशी, अतुल जैन, लेशपाल जवळगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.(Marathi Sahitya Sammelan)

98 th Marathi  Sahitya Sammelan
Rahul Gandhi News | राहुल गांधींचा नवा पत्ता, बंगला क्रमांक ५, सुनेहरी बाग रस्ता, दिल्ली?

यापूर्वी १९५४ ला दिल्लीत मराठी साहित्य संमेलन झाले. दिल्लीत स्थळ निश्चित झाल्यास ७० वर्षानंतर ऐतिहासिक साहित्य संमेलन करण्याचा निर्धार यावेळी दिल्लीकरांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news