SIR Deadline Extension | महाराष्ट्रात ‘एसआयआर’ला १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय; अन्य चार राज्यांचाही समावेश
SIR Deadline Extension |
SIR Deadline Extension | महाराष्ट्रात ‘एसआयआर’ला १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून (एसआयआर) देशभरात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी महाराष्ट्रासह सहा राज्यांतील नागरिकांना मतदार यादीसंदर्भात दावे आणि आक्षेप नोंदवण्यासाठी १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. आधी ही मुदत २६ ऑक्टोबरपर्यंत होती.

नागालँड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि हरियाणा या अन्य चार राज्यांमध्येही दावे आणि आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात ही मुदत २६ ऑक्टोबर रोजी संपली होती. मात्र, आता नागरिकांना १३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. आंध्र प्रदेश आणि हरियाणामध्ये २० नोव्हेंबर, नागालँडमध्ये २५ नोव्हेंबर, तर तेलंगणामध्ये २६ नोव्हेंबरपर्यंत दावे आणि आक्षेप नोंदवता येतील.

निवडणूक आयोगाने संबंधित राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले आहेत. नव्या वेळापत्रकानुसार, महाराष्ट्रासह या पाच राज्यांतील अंतिम मतदार याद्या ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे मतदार यादीत नाव नसलेल्या किंवा नोंदींबाबत आक्षेप असलेल्या नागरिकांसाठी ही महत्त्वाची संधी ठरणार आहे.

महाराष्ट्रासाठी सुधारित वेळापत्रक

दावे आणि आक्षेप नोंदवण्याची मुदत आधी २६ ऑक्टोबरपर्यंत होती व आता ती १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. नोटीस बजावणे आणि दाव्यांच्या विल्हेवाटीची प्रक्रिया आता २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत चालणार असून अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत जाहीर करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.