श्रीकृष्‍ण आणि भगवद्‌गीता..... अमेरिकेच्या तुलसी गबार्ड काय म्‍हणाल्‍या ?

Tulsi gabbard | ANI ला दिलेल्‍या मुलाखतीत व्यक्‍त केल्‍या भावना
Tulsi gabbard
तुलसी गबार्ड ( Image Source ANI )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क अमेरिकेच्या तुलसी गबार्ड यांचे एक वक्‍तव्याने लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकी नॅशनल इंटेलेजिन्सच्या डायरेक्‍टर असलेल्‍या तुलसी गबार्ड यांनी केलेले वक्‍तव्य हिंदूचा धर्मग्रंथ व भारतीयांच्या तत्‍वज्ञानाचा पाया असलेल्‍या भगवत्‌गीतेबाबत आदर द्वीगुणित करणारे आहे. माणसाच्या कठीण काळात भगवत्‌गीता त्‍याला आधार देत असते. जगातील अनेक विद्वानांनी हे अनुभवले आहे. आता तुलसी गबार्ड यांनी हीच बाब पुन्हा अधोरेखित केली आहे. त्‍यांनी म्‍हटले आहे. ‘जगात कुठेही सुरु असलेली युद्धजन्य परिस्‍थिती असो किंवा वर्तमानस्‍थितीत समोर येणारी आव्हाने यांचा समर्थपणे सामना करण्यास मनुष्‍य तयार असतो. ही भगवान श्रीकृष्‍णांनी जगाला दिलेली देणगी आहे. मी आजही चांगल्‍या किंवा वाईट परिस्‍थित भगवत्‌गीतेचीच साथ घेते.’

तुलसी गबार्ड या पहिल्‍या हिंदू अमेरिकन महिला आहेत ज्‍या २०१३ मध्ये पहिल्‍यांदा अमेरिकन संसदेत नियुक्‍त झाल्‍या होत्‍या. त्‍यावेळी त्‍यांनी भगवत्‌गीतेवर हात ठेवून आपल्‍या पदाची शपथ घेतली होती. त्‍या श्रीकृष्‍णाच्या भक्‍त असून अनेकवेळा भगवत्‌ गीता आपल्‍याला प्रेरणा देत असतात हे त्‍यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे.

अमेरिकेमध्ये अनेक राजकीय व्यक्‍तिमत्‍वे भगवत्‌गीता व श्रीकृष्‍णाविषयी श्रद्धा प्रकट करत असतात. सध्या एफबीआयचे डायरेक्‍टर असलेले व पेशाने वकील असलेले काश पटेल यांनी सभागृहात एका सुनवाणीदरम्‍यान आपल्‍या आईवडीलांची ओळख करुन देताना ‘जय श्रीकृष्‍ण’ असे म्‍हटले होते. ‘मी माझे वडील प्रमोद व आई अंजना यांचे स्‍वागत करतो जे आज इथे उपस्‍थित आहेत आणि ही माझ्‍यासाठी खूप मोठी गोष्‍ट आहे जय श्रीकृष्‍ण’ असे वक्‍तव्य त्‍यांनी सदनात केले होते.

त्‍याचबरोबर अमेरिकी काँग्रेसचे सदस्‍य सुहास सुब्रमण्यम यांनी शपथग्रहण घेताना गीतेवर हात ठेवून शपथ घेतली होती. त्‍यांची परंपरा कायम ठेवत २०१३ मध्ये तुलसी गबार्ड यांनीही गीतेवर हात ठेवत शपथग्रहण केली होती. त्‍याचबरोबर भारतीय वंशाचे राजा कृष्‍णमूर्ती यांनी भगवत्‌ गीतेतील एक श्लोक म्‍हटला होता.

जगात होत असलेल्‍या भौतिक साधनसुविधेच्या अतिरेकाने मनुष्‍याचे मानसिक आरोग्‍य बिघडत चालेले आहे. त्‍यामुळे अनेक विदेशी लोक भगवत्‌गीतेच्या तत्‍वज्ञानाकडे आकृष्‍ट होत असतात. भारतीय जीवनपद्धती, श्रद्धा, संस्‍कृती याचा अंगिकार करण्याकडे विदेशी लोकांचा कल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news