गुजरातमधील महादेव मंदिरातून प्राचीन शिवलिंग चोरीला, बातमीने उडाली खळबळ

Mahashivratri 2025 पोलिस म्‍हणाले, समुद्रातही घेणार शोध...
shivling stolen from bhidbhanjan bhavaneeshvar mahadev temple police start investigation
गुजरातमधील महादेव मंदिरातून प्राचीन शिवलिंग चोरीला, बातमीने उडाली खळबळPudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन :

आज महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशभरात मोठ्या भक्‍तिभावाने आणि उस्‍ताहाने साजरा होत आहे. अशावेळी गुजरातच्या एका मंदिरातून प्राचीन शिवलिंगाची चोरी झाल्‍याचे समोर आले आहे. या बातमीने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना जेंव्हा पुजाऱ्याला समजली तेंव्हा त्‍यांनी याची माहिती पालीसांना कळवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासास सुरूवात केली. महाशिवरात्रीच्या आदल्‍या दिवशी घडलेल्‍या या प्रकाराने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (Mahashivratri 2025)

पुजाऱ्याने मंदिराचा दरवाजा उघडला  तेंव्हा....

भीडभंजन भवनेश्वर महादेव मंदिर देवभूमी व्दारका जिल्‍ह्यात समुद्राच्या किणाऱ्यावर कल्‍याणपूर येथे वसले आहे. हे मंदिर खूप प्राचीन असल्‍याचे सांगण्यात येते. पोलिसांच्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे पुजाऱ्याने पुजेसाठी मंदिराचा दरवाजा उघडला, तेंव्हा आतले दृष्‍य पाहून त्‍याला धक्‍का बसला. पुजाऱ्याने जसा मंदिराचा दरवाजा उघडला तेंव्हा त्‍याला शिवलिंग जाग्‍यावर नसल्‍याचे त्‍याला दिसून आले. यानंतर पुजाऱ्याने याची माहिती पोलिसांना दिली. ही घटना महाशिवरात्रीच्या आदल्‍या दिवशी मंगळवारी घडली.

पाेलिस पथकांकडून तपास सुरू

घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी शिवलिंग शोधण्यासाठी पथके करून तपासाला सुरूवात केली आहे. यामध्ये स्‍थानिक गुन्हे अन्वेशन, क्राईम ब्रांच, स्‍पेशन ऑपरेशन ग्रुप आणि फॉरेन्सिक एक्‍सपर्टची टीम सहभागी झालेली आहे. डॉग स्‍क्‍वॉडची देखील मदत घेतली जात आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

या प्रकरणी पोलीस अधीक्षक नितेश पांडे म्‍हणाले, भीडभंजन भवनेश्वर महादेव मंदिराच्या पुजारीने या घटनेची माहिती दिली की, मंदिरात शिवलिंगाची चोरी झालेली आहे. त्‍यावरून आम्‍ही या ठिकाणी येउन पाहणी केली आहे. या शिवलिंगाच्या शोधासाठी आम्‍ही पथके तयार केली आहेत. हे शिवलिंग समुद्रातही लपवले असण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे आम्‍ही विशेष स्‍कुबा डायव्हर्स आणि पोहणाऱ्यांनाही बोलावले आहे. हे मंदिर प्राचीन असून, भाविकांची या मंदिराप्रती मोठी श्रद्धा जोडली गेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news