Operation Tiger | उबाठा खासदार संजय देशमुख शिंदे यांच्या मंत्र्यांच्या भेटीला

‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पुन्हा उधाण
Operation Tiger |
Operation Tiger | उबाठा खासदार संजय देशमुख शिंदे यांच्या मंत्र्यांच्या भेटीला
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. प्रतापराव जाधव यांच्या दिल्लीस्थित निवासस्थानी सोमवारी ही भेट झाली. राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा सुरू असताना ही भेट झाली. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. मात्र, मतदारसंघातील कामासंदर्भात मंत्र्यांची भेट घेतल्याचे संजय देशमुख म्हणाले. दरम्यान, याच सगळ्या धामधुमीत ठाकरे गटाचे नेते सोमवारी रात्री संजय राऊत दिल्लीत दाखल झाले.

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक रविवारी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पार पडली. या बैठकीला केवळ ४ खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. स्वतः संजय देशमुख या बैठकीला प्रत्‍यक्ष हजर नव्‍हते.

शिवसेना खासदारांची पर्याप्त संख्या जमतेय?

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या गटातील किमान ६ खासदार येऊन मिळणार अशी खात्री राजकीय वर्तुळाला झाली असली तरी दोन तृतीयांश बहुमतासाठी अद्याप योग्य ती संख्या शिंदे गटाला मिळालेली नाही असा उबाठाचा अंदाज आहे. दुपारपर्यंत या विषयाबद्दल खात्री व्यक्त केली जात होती, मात्र रात्री उशिरा उबाठाने आम्हाला अजून खात्री झाली नसल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news