

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावरील सुनावणी ७ मे रोजी होणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणावरील सुनावणी १४ मे रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात ही तारीख नमूद करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर जवळपास दीड वर्षानंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध फेब्रुवारी २०२३ मध्ये ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर काही तारखा या प्रकरणाच्या पडल्या मात्र सुनावणी होऊ शकली नाही. सप्टेंबर २०२३ पासून हा विषय पटलावर आलेला नाही. नेहमीच तारीख दिली जात होती. मात्र, ती कोणत्या ना कोणत्या कारणाने पुढे जाते. जवळपास दीड वर्षाच्या कालावधीनंतर हे प्रकरण न्यायालयाच्या पटलावर आहे.
Shiv Sena, NCP, symbol dispute, Election Commission, hearing date, party symbol, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Ajit Pawar, Maharashtra politics