

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे आणि पी. सी.चाको यांनी काही महत्वपूर्ण समित्या राष्ट्रीय पातळीवर तयार केल्या आहेत. यामध्ये स्वतः शरद पवारांसह देशाच्या विविध भागातील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
केंद्रीय संसदीय मंडळ, उच्चाधिकार समिती, शिस्तपालन समिती, सदस्यता मोहीम समिती, संशोधन व प्रशिक्षण समिती अशा ५ समित्या तयार करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांना संसदीय मंडळात स्थान देत पक्षसंघटनेत महत्वाच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
१) केंद्रीय संसदीय मंडळाचे शरद पवार अध्यक्ष तर सुप्रिया सुळे निमंत्रक आहेत. पी. सी. चाको, जयंत पाटील, खा. फौजिया खान, खा. अमोल कोल्हे, मोहम्मद फैजल, जयदेव गायकवाड, राजीव झा, के. के. शर्मा हे सदस्य आहेत.
२) उच्चाधिकार समितीमध्ये शरद पवार अध्यक्ष असून सुप्रिया सुळे निमंत्रक आहेत. पी. सी. चाको, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, नरेंद्र वर्मा, माजी खासदार वंदना चव्हाण, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अनिल देशमुख सदस्य आहेत. राजीव झा सदस्य आणि समन्वयक आहेत.
३) शिस्तपालन समितीमध्ये सुप्रिया सुळे अध्यक्ष आहेत तर, पी. सी. चाको, जितेंद्र आव्हाड, खा. अमर काळे, खा. बजरंग सोनवणे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा. नीलेश लंके, खा. बाळ्यामामा म्हात्रे सदस्य आहेत.
४) सदस्यता मोहीम समितीमध्ये उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष के. के. शर्मा अध्यक्ष आहेत तर नरेंद्र वर्मा, विरेंद्र वर्मा, नसीम सिद्दिकी, राजीव झा सदस्य आहेत. आर. ब्रजेश कुमार, ब्रजेश त्रिपाठी समन्वयक आहेत.
५) संशोधन व प्रशिक्षण समितीमध्ये पी. सी. चाको अध्यक्ष आहेत. खा. फौजिया खान, वंदना चव्हाण, राष्ट्रीय प्रवक्ते क्लायडो क्रास्टो, विकास लवांडे, रवी वर्पे सदस्य असून राष्ट्रीय प्रवक्ते अनिश गवांदे सदस्य समन्वयक आहेत.