नीलम गोर्‍हेंच्‍या आराेपांवर शरद पवारांनीही केले भाष्‍य; म्‍हणाले, "त्‍या चारवेळा आमदार.."

संजय राऊत बोलतात ते योग्‍यच, साहित्‍य संमेलन म्‍हटलं की वाद आलेच!
Sharad Pawar
शरद पवार. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा खळबळजनक आरोप विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोहे यांनी ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केला होता. यावर आज (दि. २४) राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारा यांनी भाष्‍य केले. नीलम गोर्‍हे चारवेळा आमदार कशा झाल्‍या हे सर्वाना माहित आहे,अनेक पक्षांचा अनुभव घेतलेल्‍या नीलम गोर्‍हेंनी, असे विधान करायला नको होते, असा टाेला त्‍यांनी लगावला.

अनेक पक्षांचा अनुभव घेतलेल्‍या गोर्‍हेंनी असे विधान करायला नको होते

नवी दिल्‍लीत आज पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्‍हणाले की, "ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असे विधान अनेक पक्षांचा अनुभव घेतलेल्‍या गोर्‍हेंनी असे विधान करायला नको होते.नीलम गोर्‍हे चारवेळा आमदार कशा झाल्‍या हे सर्वाना माहित आहे."

संजय राऊत बोलतात ते योग्‍यच

नीलम गोर्‍हे यांच्‍याबाबत संजय राऊत जे बोलले ते १०० टक्‍के योग्‍य होते. ते नेहमीच योग्‍यच बोलतात. मी स्‍वागताध्‍यक्ष असल्‍याने राउतांना माझ्‍यावर जबाबदारी टाकायची असेल, असेही शरद पवार म्‍हणाले.

साहित्‍य संमेलन म्‍हटलं की वाद हे आलेच

साहित्‍य संमेलन राजकारण्‍यांनी हायजॅक केले हा आरोप मला मान्‍य नाही, असे सांगत दिल्‍लीतील साहित्‍य संमेलनात देशभरातून गर्दी झाली. साहित्‍य संमेलन म्‍हटलं की वाद हे आलेच, असेही पवार म्‍हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news