Chandrapur MLC Election | उमेदवारी परस्पर माघारी घेणे भोवले! काँग्रेसने केले शैलेश अग्रवाल यांचे पक्ष सदस्यत्व रद्द

पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून उमेदवारी मागे घेतल्याचा ठपका; प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाने निलंबन
Chandrapur MLC Election
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शैलेश अग्रवाल यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करत त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.Pudhari
Published on
Updated on

Chandrapur MLC Election

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अग्रवाल यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करत त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

पक्ष नेतृत्वाला कल्पना न देता उमेदवारी अर्ज मागे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, शैलेश अग्रवाल यांच्या विनंतीवरून काँग्रेसने त्यांना चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी पक्ष नेतृत्वाला कोणतीही कल्पना न देता उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांच्या या कृतीमुळे पक्षासमोर अडचणी निर्माण झाल्या असून ही बाब अत्यंत गंभीर आणि चुकीची असल्याचे पत्रात नमूद करण्‍यात आले आहे.

Chandrapur MLC Election
Chandrapur MLC Election | काँग्रेसचे शैलेश अग्रवाल, अपक्ष कोठारींचीही माघार; अरुण लखानी अविरोध विजयी

अचानक अर्ज मागे घेतल्‍या काँग्रेस नेतृत्त्‍वाला धक्‍का

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने महायुतीविरोधात लढत देण्यासाठी अग्रवाल यांच्यावर विश्वास दाखविला होता. मात्र, नामांकन मागे घेण्याच्या अंतिम दिवशी त्यांनी अचानक अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या स्थानिक तसेच राज्य नेतृत्वाला धक्का बसला होता. विशेष म्हणजे, उमेदवारी मागे घेताना त्यांनी पक्षाच्या अनेक स्थानिक नेत्यांनाही विश्वासात घेतले नसल्याची चर्चा आहे.

Chandrapur MLC Election
Ahilyanagar Local Bodies Election: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नाट्यमय घडामोडी; एबी फॉर्म असूनही काँग्रेस उमेदवाराचा अर्ज थांबला

अग्रवाल यांनी केले होते गंभीर आरोप

अग्रवाल यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर संख्याबळ अपुरे असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. तसेच काही काँग्रेस नेते भाजपशी संगनमत करून मतदारांमध्ये पैशांचे वाटप करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.दरम्यान, काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी या दोघांनीही माघार घेतल्यानंतर महायुतीचे उमेदवार अरुण लाखानी यांची अविरोध निवड निश्चित झाली.

Chandrapur MLC Election
Nanded MLC election | विधान परिषद निवडणूक : नांदेडमध्ये महायुतीतील बंडखोरी टळणार!

काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्‍हा एकदा समोर

अग्रवाल यांच्या निलंबनामुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. पक्षाने उमेदवारी दिलेल्या उमेदवारावर थेट सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील संघटनात्मक स्थितीबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news