शाहिन, मुझम्मिलने बॉम्बसाठी ‘अल-फलाह’तून चोरले केमिकल

Red Fort Bomb Blast
शाहिन, मुझम्मिलने बॉम्बसाठी ‘अल-फलाह’तून चोरले केमिकल
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : बॉम्ब बनवण्यासाठी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून रसायने चोरली होती, असा कबुली जबाब फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठातील डॉ. शाहिन सईद आणि डॉ. मुझम्मिल यांनी ‘एनआयए’समोर चौकशीदरम्यान दिला.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), जम्मू-काश्मीर पोलिस, दिल्ली गुन्हे शाखा, हरियाणा एटीएस अशा अनेक पथकांकडून फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठातून चालवल्या जाणार्‍या ‘व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल’ची चौकशी करण्यात येत आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. विद्यापीठाच्या लॅबोरेटरीतून बॉम्ब बनवण्यासाठी केमिकल चोरली होती. त्यांचा वापर बॉम्ब बनवण्यासाठी कसा करायचा, याचे मार्गदर्शन मिळवले होते, असेही परवेज मुझम्मिलने कबूल केले. तर, डॉ. शाहिनने ती महिलांच्या आत्मघातकी पथकाची उभारणी करत असल्याची धक्कादायक माहिती दिली.

दरम्यान, तपास यंत्रणांतील अन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर आत्मघातकी बॉम्बर्सची एक टीम तयार करत होता. डॉ. उमर नबी स्वतःसारख्या अधिक आत्मघाती हल्लेखोरांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत होता. तो तरुणांचे ब्रेन वॉश करण्यासाठी त्यांना प्रेरणादायी व्हिडीओ तयार करून पाठवत होता. हे व्हिडीओ 11 व्यक्तींना पाठवण्यात आले होते, त्यापैकी सात काश्मिरी होते आणि ते सर्व कोणत्या ना कोणत्या प्रकारे विद्यापीठाशी जोडलेले होते. उर्वरित चारजण उत्तर प्रदेश, केरळ आणि कर्नाटकमधील असल्याचे सांगितले जाते.

उमरला कार देणार्‍याने आत्मघातकी बॉम्बर बनण्यास नकार दिला होता, त्यानंतर त्याला हे व्हिडीओ पाठवण्यात आले. उमरच्या व्हायरल व्हिडीओच्या चौकशीत असे दिसून आले की, त्याचा एकटा आत्मघातकी बॉम्बर बनण्याचा हेतू नव्हता. त्याऐवजी तो आत्मघातकी बॉम्बरची एक संपूर्ण टीम तयार करत होता.

70 व्हिडीओंची चौकशी सुरू

तपास पथकातील दिल्लीस्थित एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, असे अंदाजे 70 व्हिडीओ इंटरसेप्ट करण्यात आले आहेत, त्यापैकी 12 व्हिडीओ डॉ. उमरने शूट केले होते. हे व्हिडीओ सुशिक्षित तरुणांना पाठवण्यात आले होते, ज्यांना तो आत्मघाती बॉम्बर म्हणून लक्ष्य करत होता.

इंग्रजी टोनदेखील तपासणीखाली

डॉ. उमर याच्या व्हिडीओमधील स्वराबद्दलही ‘एनआयए’ला संशय आहे. डॉ. उमर याचे इंग्रजी अस्खलित असले, तरी त्यात कृत्रिम स्वर असल्याचे दिसून येते.

तो भारतीय, अमेरिकन किंवा ब्रिटिश असा दिसत नाही. ‘एनआयए’ची सायबर आणि भाषा न्यायवैद्यक पथके इंग्रजीचा हा विशिष्ट उच्चार कुठे शिकवला जातो याचा तपास करत आहेत. ‘एनआयए’ने या उच्चाराची ओळख पटविण्यासाठी लष्करी गुप्तचरांकडूनही माहिती मागितली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news