'महाकुंभ'वरुन परतताना भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात ७ ठार

Accident News : जबलपूरनजीक आंध्र प्रदेशमधील बसला ट्रकची धडक
Accident News
प्रातिनिधिक छायाचित्र.File photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रयागराज येथे सुरु असलेल्‍या महाकुंभ मेळ्याहून परतणार्‍या आंध्र प्रदेशातील प्रवासी बसला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात सात भाविक ठार झाले आहेत. जबलपूरमधील मोहला-बर्गीजवळ आज (दि. ११) सकाळी ९:१५ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

आंध्र प्रदेशमधील भाविक महाकुंभसाठी प्रयागराजला गेले होते. आज सकाळी ते बसने परतीचा प्रवास करत होते. मोहला-बर्गीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३० वर ट्रकने बसला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, सात भाविक जागीच ठार झाले. जबलपूरचे जिल्‍हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्‍थळी दाखल झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news