

नोएडा : पुढारी ऑनलाईन
चार मुलांसह पाकिस्तानातून ग्रेटर नोएडाला आलेली सीमा हैदर पाचव्यांदा गरोदर आहे. ती तीचा प्रियकर सचिन मीणाच्या मुलाची आई होणार आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, सीमा ही ७ महिन्यांची गरोदर आहे. सीमा हैदरने प्रेग्नंसी किटचा व्हिडिओ शेअर करत या विषयी माहिती दिली आहे. (Seema Haider Pregnant)
गेल्या काही दिवसांपासून माध्यमांपासून तसेच प्रसिद्धीपासून दूर पळत असलेल्या सीमा हैदरने ही बातमी देत एक धमाका केला आहे. पाकिस्तानहून चार मुलांसोबत नोएडाला आलेली सीमा आता पाचव्यांदा गरोदर आहे. सीमा हैदरच्या गरोदरपणावर या आधीही चर्चा होत होत्या. मात्र यावेळी एकदम पक्की बातमी समोर आली आहे असे म्हणावे लागेल. सचिनने व्हिडिओ शेअर करत पुरावे देत याचा खुलासा केला आहे. सीमा ७ महिन्यांची गरोदर आहे. लवकरच नव्या वर्षात ती आई बनेल. सीमा या आधी चार मुलांची आई आहे. ती पाकिस्तानमधून पळून भारतात आली होती.
बेबी बंप आणि प्रेग्नंसी किट व्दारे आई बनण्याचे पुरावे देत सीमा हैदरने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही प्रेग्नंसीचा खुलासा करण्याचे टाळले, कारण वाईट नजरेचे काही लोक असतात. सीमाची प्रकृती गरोदरपणाच्या सुरूवातीच्या दिवसात काहीशी बरी नसायची. तीला वाटायचे की, सर्व काही ठिक झाल्यावर सर्वांना ही बातमी द्यावी. मात्र आता तीने आपण गराेदर असल्याचे जाहीर केले आहे.
सचिन आणि सीमा या बातमीचा व्हिडिओ शेअर करताना खूप आनंदीत असल्याचे दिसून आले. पाकिस्तानमधून अवैध स्वरूपात भारतात आलेली सीमा हैदर आपल्या सोबत चार मुलांना घेउन आली आहे. जामिनावर बाहेर असलेली सीमा अजूनही पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात आहे. ती सध्या रबूपुरामध्ये राहते. दुसरीकडे तीने राष्ट्रपतींकडे भारतीय नागरिकतेसाठी याचिकाही दाखल केली आहे.
सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला जेंव्हा आपल्या चार मुलांसह प्रेमीसाठी भारतात आली तेंव्हा देशभर याची चर्चा झाली होती. माध्यमांनीही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली होती. मात्र सीमा हैदर ही अवैद्यरित्या भारतात आल्याने पोलिसांचे तीच्यावर लक्ष असून, अजुनही ती चौकशीचा फेऱ्यात आहे. अनेक तपासयंत्रणांनी तीची या आधीही चौकशी केली आहे. मात्र आपण सचिन मीणाच्या प्रेमापोटी हे धाडस करून भारतात आल्याचे म्हटले होते.