Chandra Grahan 2026 | ९६% चंद्र आज झाकोळणार

रक्षाबंधनदिनी यंदाचे शेवटचे चंद्रग्रहण
Chandra Grahan 2026  |
Chandra Grahan 2026 | ९६% चंद्र आज झाकोळणार
Published on
Updated on

नवी दिल्‍ली; वृत्तसंस्‍था : रक्षाबंधनाच्‍या सणासोबतच शुक्रवारी (दि. २८) या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण लागणार आहे. पंचांगानुसार या ग्रहणाची सुरुवात सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी होईल आणि ते सकाळी ११ वाजून २१ मिनिटांनी समाप्त होईल. अंशतः चंद्रग्रहणाच्‍या या काळात परम अवस्थेच्या वेळी चंद्राचा बहुतेक भाग पृथ्वीच्या छायेत पूर्णपणे (सुमारे ९६ टक्‍के) झाकोळला जाईल. यामध्ये चंद्र कापलेला दिसेल.

हे चंद्रग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, पॅसिफिक महासागराचे पूर्व भाग आणि अटलांटिक महासागरात दिसेल. व्हिएन्ना, पॅरिस, रोम, बर्लिन, प्राग, ब्रुसेल्स, माद्रिद, लंडन, रियो दि जानेरो, न्यू यॉर्क, जोहान्सबर्ग व ब्युनोस आयर्स या शहरांत हे चंद्रग्रहण पूर्णपणे नजरेस पडेल; तर भारत, बांगला देश, चीन, जपान, नेपाळ, श्रीलंका, ऑस्ट्रेलियाचा बहुतांश भाग, पश्चिम पॅसिफिक महासागर आणि आशियातील बहुतांश भागांत हे ग्रहण दिसणार नाही. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्‍याने ग्रहणाचा सुतक काळही पाळण्‍याची गरज भासणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news