'एसबीआय'चा ग्राहकांना झटका, कर्जावरील व्‍याज दरात वाढ

आजपासून कर्जावरील व्‍याजाचे नवीन दर हाेणार लागू
SBI increased loan interest
स्टेट बँक ऑफ इंडिया ने कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. Representative image

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोट्यवधी ग्राहकांना आज झटका बसला. SBI ने कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ठराविक कालावधीसाठी निधी-आधारित कर्ज दर (MCLR) मध्ये 10 बेस पॉइंट्स (bps) पर्यंत वाढ केली आहे.

आजपासून नवीन दर लागू

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, कर्जावरील नवीन व्याजदर सोमवारपासून म्हणजेच १५ जुलैपासून लागू झाले आहेत. या वाढीमुळे गृहकर्ज, वाहन यांसारखी ग्राहक कर्जे महाग होणार आहेत. एसबीआयने एमसीएलआर वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. एसबीआयने 'ईबीएलआर'मध्ये कोणताही बदल केलेला नाही. MCLR वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news