

पुढारी ऑनलाईन डेस्कः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर हिच्यावर आता मोठी जबाबदारी आली आहे. स्वतः सचिन याने याबाबतची घोषणा केली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सचिनने सुरु केलेल्या ‘सचिन तेंडुलकर फौंडेशन’ सुरु केले आहे. आता या फौंडेशननसंदर्भात एक बातमी समोर येत आहे.
स्वतः सचिन तेंडुलकरने याची घोषणा केली असून. आपली मुलगी सारा तेंडुलकर हिची संचालक म्हणून आता या फौंडेशनवर निवड झाली आहे. सारा आता या फौंडेशनमध्ये संचालक म्हणून काम करणार आहे. सचिनने समाजमाध्यम एक्स वर पोस्ट लिहीत ही घोषणा केली आहे. या पोस्ट मध्ये त्याने ‘Overjoyed’ (अत्यानंद) अशा शब्दात ही माहिती दिली.
पुढे सचिन याने म्हटले आहे की मला खूप आनंद होत आहे की माझी मुलगी सारा आता सचिन तेंडुलकर फौंडेशनमध्ये काम करणार आहे. तीने नुकतीच लंडन युनिव्हर्सीटी येथून मास्टर डिग्री घेतली आहे. क्लिनीकल ॲन्ड पब्लिक हेल्थ न्युट्रीशएन या विषयामध्ये तिने ही पदवी घेतली आहे. क्रीडा, आरोग्यसेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून भारताला सक्षम बनवण्याच्या या प्रवासाला सुरुवात करताना, जागतिक शिक्षणाचा उपयोग कसा हाऊ शकतो यासंदर्भात ती आता काम करेल. असेही सचिन तेंडुलकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे.