

नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुड्रो हे खलिस्तानवाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप भारताचे कॅनडातील उच्चायुक्त संजय वर्मा यांनी दिली.
खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येत वर्मा यांचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, निज्जर याच्या हत्येशी भारताचा काहीही संबंध नाही. जस्टीन हे खलिस्तानवाद्यांच्या माध्यमातून भारतासोबतचे संबंध बिघडवत आहे. मी खलिस्तानवाद्यांना शीख समजत नाही. कारण शीख समुदाय कुणाला मारत नाहीत.
खलिस्तानवादी हे दहशतवादी आहेत, असे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. दरम्यान, कॅनडातील विरोधी पक्षाच्या खासदारांनी टुड्रो यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. टुड्रो हे खलिस्तानवाद्यांना आश्रय देत असल्यामुळे त्यांनी 28 ऑक्टोबरपर्यंत राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली आहे.