JDU : जेडीयूच्या कार्याध्यक्षपदी संजय झा यांची निवड

दिल्लीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांची घोषणा
Sanjay Jha new  working president of JDU
जेडीयूचे राज्यसभा खासदार संजय झा यांची पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून निवड केली.Pudhari News Network

पुढारी ऑनलाईन डेस्क : जेडीयूचे राज्यसभा खासदार संजय झा यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज (दि.२९) झाली. नितीश कुमार यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, ज्याला सर्व कार्यकारिणी सदस्यांनी मंजुरी दिली. यावेळी केसी त्यागी, लालन सिंह, विजय कुमार चौधरी, देवेशचंद्र ठाकूर यांच्यासह पक्षाचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

Sanjay Jha new  working president of JDU
Bihar Politics Crisis : …तरीही इंडिया आघाडी भक्कम; नितीशकुमार यांच्या निर्णयानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया

पक्ष विस्तारासाठी संघटनेचा विस्तार करणे आवश्यक

पक्ष विस्तारासाठी संघटनेचा विस्तार करणे आवश्यक आहे. अशा स्थितीत संघटनेच्या विस्तारावर कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय अध्यक्षांच्या मदतीसाठी अनेक पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. कार्यवाह राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संजय झा यांचे नाव आघाडीवर होते. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे, असे पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र कुमार यांनी सांगितले.

Sanjay Jha new  working president of JDU
Bihar Politics : बिहारच्‍या ‘राजकारणा’वर ‘जेडीयू’ प्रवक्त्यांचा मोठा दावा, “नितीशकुमार उद्या …”

संजय झा नितीश कुमार यांचे निकटवर्तीय

संजय झा नितीश कुमार यांच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जातात. गेल्या काही काळापासून नितीशकुमार त्यांच्या सर्व कामांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. नुकतीच त्यांची राज्यसभेत जेडीयूचे नेते म्हणून निवड झाली आहे. आता त्यांना ही नवी जबाबदारी देण्यात आली आहे. खुद्द नितीशकुमार यांनी ही घोषणा केली. सर्व सदस्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. बिहारमधील पक्षश्रेष्ठींमध्येही आनंदाचे वातावरण आहे. पाटण्यात या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news