

Cobra Bite Snake Catcher नागासारख्या विषारी सापाबरोबर मस्ती करु नये हे एका घटनेतून समोर आले आहे. एका घरात नागाला पकडण्यासाठी एका सर्पमित्राला बोलवण्यात आले होते. तो सर्पमित्र अगदी कॅज्युअली नागाला पकडत होता, त्याच वेळी नागाला स्टिकवर पकडून तो फोनवर बिनधास्त बोलणे सुरु होते, मग असे काही घडले की सर्पमित्राला चांगलीच अद्दल घडली आहे. तो तळमळत हॉस्पिटलच्या बेडवर पोहचला आहे ही घटना घडली आहे उत्तरप्रदेशमधील संभल येथे रविवारी १२ जुलै रोजी, सर्पमित्राचे नाव जाबुल असे आहे. जाबूलला कोब्राने दंश केल्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी अन्टीव्हेनम दिल्याने व तत्काळ उपचार सुरु केल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.
नागासारख्या अतिजहाल विषारी सापाबरोबर मस्ती करणे कधीही चुकीचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसते की सर्पमित्र जाबूल कोणतेही गांर्भीय न दाखवत नागाला पकडत आहे. साप बिनविषारी असला तर तो सहज हाताळला येऊ शकतो पण सर्पमित्राला अतिशहाणपणा नडला व थेट दंश झाल्याचे दिसत आहे
फोन ठेवला पण सापाला बॅगमध्ये भरताना केला दंश
व्हिडीओत दिसत आहे की नागाला पकडल्यानंतर तो सर्पमित्र त्याला बॅगमध्ये भरण्याचा प्रयत्न करतो, पण नाग वळवळ करुन बॅगेत जात नाही, पुन्हा पुन्हा बॅगेत घालण्यासाठी प्रयत्न करतो पण नाग काही बॅगेत जात नाही मग तो हाताने नागाचे तोंड पकडतो व बॅगेत घालण्याचा प्रयत्न करता नाग त्याच्या प्रयत्नांना दाद देत नाही व त्याच्या हाताला पुन्हा वेटोळे घालतो. प्रयत्न करुन तो वेटोळे सोडवतो व बॅगेत सापाला कसाबसा कोंबतो.
हाताला वेटोळे घालून केला दंश
काळ्या बॅगेत नाग कोंबत असताना नाग चिडतो व सर्पमित्राच्या हाताला वेटोळे घालतो. बराच वेळ तो हात सोडवण्याचे प्रयत्न करता असतो पण नागानेही घट्ट बेडी घातलेली दिसून येते. याय प्रयत्नात ज्या हाताने नागाचे तोंड धरलेले असते ती पकड सैल होते व नाग डाव साधतो, एक क्षणाचाही विलंब न लावता नाग सर्पमित्राचा अंगठा पकडतो. त्यांनतर कसाबसा नाग त्या पिशवीत टाकण्यात सर्पमित्राला यश येते त्या बॅगला गाठ मारतो. व तत्काळ जाऊन जखमेवर पाणी मारताना दिसत आहे.
विषाने केला असर तळमळत पडला हॉस्पिटलमध्ये
नागाचे विष शरिरात पसरल्याने त्या सर्पमित्राला भरती केल्याचे दिसत आहे. तर विषामुळे व वेदनेमुळे सर्पमित्र बेडवर तळमळत असताना दिसत आहे. नागाने दंश केल्या केल्या तो सर्पमित्र हात झाडताना दिसत आहे. वेदनेन त्याला काही सुचत नाही. या घटनेने सर्पमित्र जरी असला तरी नागासारखे विषारी साप हाताळताना खबरदारी घेणे किती गरजेचे आहे हे अधोरेखित होते. शेवटी नागासारखा वन्यजिव आपले रक्षण करण्यासाठी दंश करणारच पण अशा बेफिकीरीने साप पकडणे जिवावर बेतू शकते हे स्पष्ट होते.
सात वर्षापासून साप पकडण्याचा अनुभव
सर्पमित्र जाबुल हा गेल्या सात वर्षांपासून तो साप पकडण्याचे काम करत आहे. त्याने सांगितले की झारखंड आणि ऑल इंडिया वाइल्डलाइफ, प्रयागराज येथून विशेष प्रशिक्षण घेतले आहे. तो म्हणाला की सापासह ४,००० हून अधिक मूक प्राण्यांची सुटका केली आहे. कोब्रा हा भारतातील 'बिग फोर' म्हणजेच चार सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. त्याच्या विषामध्ये न्यूरोटॉक्सिक घटक असतात जे थेट मेंदूवर परिणाम करतात. यामुळे सुस्ती येते आणि हळूहळू शरीर लुळे पडते, ज्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. जाबुलने सांगितले की, सर्पदंश झाल्यावर शक्य तितक्या लवकर रुग्णालयात पोहोचणे महत्त्वाचे आहे.