

पुढारी ऑनलाईन डेस्क : आसामच्या काचर जिल्ह्यातील पोलिसांनी एक मोठी कारवाई करत 1 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीला अटक देखील केली, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. काचर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक नुमल महत्ता यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे काचर जिल्हा पोलिसांनी रविवारी (दि.19) कलान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिघरखल टोल गेटवर अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर वाहतुकीविरुद्ध विशेष कारवाई केली.
"या कारवाईदरम्यान, गुवाहाटीहून ऐझवालला जाणारे वाहन क्रमांक MZ-01Z-8256 असलेले एक वाहन अडवण्यात आले. कसून तपासणीदरम्यान, कोडीन फॉस्फेटच्या 8640 बाटल्या असलेल्या 72 कार्टून आणि 2 किलो संशयित गांजा जप्त करण्यात आला. त्यानुसार जप्त केलेले अंमली पदार्थ वापरलेल्या वाहनासह जप्त करण्यात आले. या संदर्भात, ऐझवाल जिल्ह्यातील जॉयलालदन थांगा (वय.38) या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. काळ्या बाजारात जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 1 कोटी रुपये आहे," असे त्या म्हणाल्या.
डिसेंबरच्या सुरुवातीला, आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) कछार जिल्हा पोलिसांच्या सहकार्याने सिलचरमध्ये रात्री उशिरा केलेल्या कारवाईत 60000 याबा गोळ्या आणि 125 ग्रॅम हेरॉइन जप्त केले. STF प्रमुख डॉ. पार्थ सारथी महंत यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पथकाने सिलकुरी रोडवर ही कारवाई केली. पथकाने कछार जिल्ह्यातील सोनई येथील रहिवासी साहिल अहमद लस्कर याला अटक केली, जो मोटारसायकलवरून ड्रग्जची वाहतूक करत होता. "आम्ही काचार जिल्ह्यातील सोनई येथून साहिल अहमद लस्कर याला अंमली पदार्थांची वाहतूक करताना अटक केली. असे डॉ. पार्थ सारथी महंत यांनी यापूर्वी सांगितले.