Sam Pitroda on anti SIR protest : 'एसआयआर'विरोधातील आंदोलन काँग्रेस नेते सॅम पित्रोदांनीच ठरवले 'निष्प्रभ', कारणही सांगितले

तरुणांच्या याद्यांच्या पुनरीक्षणापेक्षा शिक्षण आणि रोजगारासारखे प्रश्न अधिक महत्त्वाचे
Sam Pitroda on anti SIR protest
'एसआयआर'विरोधातील आंदोलन काँग्रेस नेते सॅम पित्रोदांनी 'निष्प्रभ' ठरल्‍याचे म्‍हटलं आहे.Pudhari News
Published on: 
Updated on: 

Sam Pitroda on anti SIR protest : मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण' प्रक्रियेविरोधातील आंदोलन यशस्वी झाले आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी सांगत आहेत. तर दुसऱ्याकडे आंदोलनाचा तरुण पिढीवर (जेन झी) कोणता परिणाम झालेला नाही, असे मत पक्षाचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले आहे. तरुणांसाठी मतदार याद्यांच्या पुनरीक्षणापेक्षा शिक्षण आणि रोजगारासारखे प्रश्न अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतीय तरुणांचे रोजगार आणि शिक्षणावर अधिक लक्ष

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत सॅम पित्रोदा म्हणाले, "भारतीय तरुण 'SIR' च्या मुद्द्यापेक्षा रोजगार आणि शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. म्हणूनच विद्यार्थी-नेतृत्वाखालील NEET संबंधित आंदोलनासारखी तीव्रता 'SIR'विरोधातील आंदोलनांमध्ये दिसून आली नाही."

Sam Pitroda on anti SIR protest
'सॅम पित्रोदा यांचे चीनवरील विधान हे काँग्रेसचे मत नाही'

तरुणांच्या प्राधान्यक्रमात फरक

राहुल गांधी यांनी अलीकडे घेतलेल्या सभांचे विश्लेषण करताना पित्रोदा यांनी नमूद केले की, तरुण पिढी रोजगार, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सेवांना अधिक प्राधान्य देते. ही आंदोलने बाहेरील प्रभावामुळे सुरू झाली होती, हा आरोप निराधार आहे. तरुणांना आंदोलनासाठी भारताच्या ऐतिहासिक नेत्यांकडूनच प्रेरणा मिळाली असेही त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार

सॅम पित्रोदा यांनी 'पीटीआय' (PTI) या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पुष्टी केली की, राहुल गांधी लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पित्रोदा म्हणाले, "पहिला कार्यक्रम १७ नोव्हेंबर रोजी कोलंबिया विद्यापीठात एक अनौपचारिक चर्चासत्र असेल. या चर्चेत प्रामुख्याने जागतिक स्तरावर विद्यार्थी चळवळींचा वाढता प्रभाव, त्यांचे महत्त्व, भारतात त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, लोकशाहीवर होणारा त्यांचा परिणाम आणि शिक्षण, रोजगार, अर्थव्यवस्था व पर्यावरण यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मागण्यांवर भर दिला जाईल. मला खात्री आहे की, ही चर्चा योग्य वेळी प्रसारित केली जाईल," असेही ते म्हणाले.

Sam Pitroda on anti SIR protest
Sam Altman Chatgpt News : "पुढील ६ महिन्यांत ..." : ChatGPTबाबत सॅम ऑल्टमन यांनी केला मोठा दावा

शिकागो विद्यापीठात राहुल गांधी करणार डॉ. पेप यांच्याशी चर्चा

राहुल गांधी यांचा दुसरा कार्यक्रम १८ नोव्हेंबर रोजी शिकागो विद्यापीठात होणार असून, त्यात प्रतिष्ठित प्राध्यापक डॉ. (रॉबर्ट) पेप सहभागी होणार आहेत. पेप हे भू-राजकारणाच्या (geopolitics) क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव असून, पश्चिम आशिया आणि इराणमधील संघर्ष यांसारख्या विषयांवर त्यांचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा आणि महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे, ही दुसरी चर्चा प्रामुख्याने भू-राजकारण आणि जागतिक घडामोडींवर केंद्रित असेल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.