साहिल गहलोत याला १२ दिवसांची कोठडी

file photo
file photo
Published on
Updated on

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : निक्की यादव हत्या प्रकरणातील आरोपी साहिल गहलोत याची द्वारका न्यायालयाने १२ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. निक्की हत्या प्रकरणी साहिल याला १४ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात साहिलच्या वडिलासह त्याच्या कुटुंबातील अन्य लोकांनाही अटक करण्यात आलेली आहे. लग्नाचा तगादा लावल्यामुळे साहिलने निक्की यादवची हत्या करुन तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news