Retired RTO Official Corruption Case | निवृत्त आरटीओकडे १.६२ कोटींची रोकड, १३ किलो सोन्‍यासह ३५ कोटींची मालमत्ता

Retired RTO Official Found Case |
Retired RTO Official Found Case | निवृत्त आरटीओकडे १.६२ कोटींची रोकड, १३ किलो सोन्‍यासह ३५ कोटींची मालमत्ता
Published on
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेश दक्षता विभागाला एका निवृत्त सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍याकडे मोठे घबाड सापडले. बेकायदेशीर मालमत्ता प्रकरणात या अधिकार्‍याच्‍या घरी छापा टाकल्‍यावर पथकाला तब्‍बल १.६२ कोटी रुपयांची रोकड, १३ किलो सोने, ९ किलो चांदी आणि अंदाजे ३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे हाती लागली. ललित कुमार असे या अधिकार्‍याचे नाव आहे.

आग्रा येथे कार्यरत ललित कुमार यांच्या घरी न्‍यायालयाच्‍या सर्च वॉरंटनंतर लखनौच्‍या दक्षता पथकाने मंगळवार व बुधवारी हे छापासत्र राबवले. ललित कुमार याने त्याच्या ज्ञात उत्पन्‍नाच्या स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याचे समोर आले होते. छाप्यादरम्यान जप्त सर्व संशयास्पद मालमत्तेची पडताळणी केली जात आहे. उत्तर प्रदेश दक्षता विभागाचे महासंचालक व संचालकांनी ही कारवाई करणाऱ्या लखनौ सेक्टरच्या पथकासाठी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news