२५ रुपयाचं लोणचं रेस्टॉरंट मालकाला पडलं ३५ हजाराला!

ग्राहक न्‍यायालयाचा रेस्टॉरंट मालकाला दणका
Consumer Court
फूड पार्सलमधून लोणचं न देणे हे रेस्‍टॉरंट मालकाचा चांगलचं भोवलं. या निष्‍काळजीपणाची ग्राहक न्‍यायालयाने गंभीर दखल घेत रेस्‍टॉरंट मालकाला तब्‍बल ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. Representative image

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : फूड पार्सलमधून लोणचं न देणे हे रेस्‍टॉरंट मालकाचा चांगलचं भोवलं. या निष्‍काळजीपणाची ग्राहक न्‍यायालयाने गंभीर दखल घेत रेस्‍टॉरंट मालकाला तब्‍बल ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जाणून घेवूया नेमकं काय घडलं याविषयी...

नेमकं काय घडलं होतं?

तमिळनाडू राज्यातील विल्लुपुरम जिल्‍ह्यातील आरोग्यसामी यांच्‍या चुलत भावाची २८ नोव्हेंबर २०२२ रोजी पहिली पुण्‍यतिथी होती. यानिमित्त त्‍यांनी एका रेस्टॉरंटमध्‍ये २५ शाकाहारी थाळांच्‍या फूड पार्सलची ऑर्डर दिली होती. एका थाळेसाठी ७० रुपये आणि पार्सलसाठी १० असे रेस्‍टॉरंट मालकाने सांगितले. त्‍यानुसार आरोग्यसामी यांनी दोन हजार रुपये आगाऊ दिले होते.

लोणच्‍या विनाच दिले पार्सल

रेस्‍टॉरंटने २५ थाळी पार्सलमधून आरोग्यसामी यांच्‍या घरी दिल्‍या. तसेच मूळ बिला देण्‍यास नकार देत छोटी पावती दिली. आरोग्यसामी यांनी वडिलांना बोलावून अन्नाची पाकिटे वाटली. जेवणाचे पाकीट उघडले असता त्यात फक्त लोणचेच गायब असल्याचे दिसून आले. त्‍यांनी रेस्‍टॉरंट मालकाकडे तक्रार केली असता जेवण पॅक करताना लोणची ठेवली जात नसल्याचे त्‍यांनी सांगिले. आरोग्यसामी यांनी हॉटेल मालकाला 25 लोणच्यांच्या पाकिटासाठी 1 रुपये प्रति पॅकेट दराने 25 रुपये परत करण्यास सांगितले.मात्र रेस्टॉरंट मालकाने याला नकार दिला.

लोणचे न देणे रेस्टॉरंट मालकाला पडले भलतेच महागात

वास्‍तविक आरोग्यसामी यांनी हॉटेल मालकाला 25 लोणच्यांच्या पाकिटासाठी 1 रुपये प्रति पॅकेट दराने 25 रुपये परत करण्यास सांगितले.मात्र रेस्टॉरंट मालकाने याला नकार दिला. आरोग्यसामी हे ऑल कंझ्युमर्स पब्लिक एन्व्हायर्नमेंटल वेलफेअर असोसिएशनचे राज्य अध्यक्ष आहेत. त्‍यांनी रेस्‍टॉरंट मालकाविरोधात ग्राहक न्‍यायालयात तक्रार दाखल केली. त्‍यांनी आपल्‍या तक्रारी म्‍हटलं होतं की, जेवणात लोणचे नसल्यामुळे वयोवृद्ध लोक प्रचंड अस्वस्थ झाले होते.

रेस्टॉरंट मालकाला ३५ हजार रुपयांचा दंड

या प्रकरणी ग्राहक आयोगाचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्‍यासह सदस्य मीरामोईदीन आणि कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. दोन्‍ही बाजूंचा युक्‍तीवाद ऐकला आणि चौकशीअंती ग्राहक तक्रार समितीने स्‍पष्‍ट केले की, पार्सल केलेल्या फूड पॅकेटमध्ये लोणचे न देणे ही सेवेतील कमतरता आहे. आरोग्यासमीला झालेल्या त्रासामुळे रेस्टॉरंट मालकाला 30,000 रुपये दंड भरावा लागेल. तसेच चाचणी दरम्यान झालेल्या खर्चासाठी ५ हजार रुपये भरावे लागतील. ४५ दिवसांत दंडाची रक्कम न भरल्यास रेस्टॉरंट मालकाला दरमहा ९ टक्के व्याजासह दंड भरावा लागेल, असेही ग्राहक न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news