

देवळाली कॅम्प : येथील ११६ इन्फंट्री बटालियन (टेरिटोरिअल आर्मी) पॅरा, ११८ इन्फंट्री बटालियन (टेरिटोरिअल आर्मी) ग्रेनेडियर आणि १२३ इन्फन्ट्री बटालियन (टेरिटोरिअल आर्मी) ग्रेनेडियर या प्रादेशिक सेनेच्या तीन बटालियन्स साठीच्या जागांसाठी राज्य/जिल्हावार लष्करी सैन्य भर्ती प्रारंभ आज दिनांक ४ पासून होत आहे. यासाठी प्रतिदिन वेगवेगळ्या राज्यांना वेळ दिलेली असून गेल्या दोन दिवसापासून अनेक युवक देवळाली येथे दाखल होत आहेत. दिनांक ४ पासुन १३ नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या भर्ती प्रक्रियेसाठी लष्कराकडून देवळाली कॅम्प आनंदरोड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (कॅन्टोन्मेंट बोर्ड) स्टेडियम येथे तयारी पूर्ण झालेली असल्याचे लष्करी सूत्राने सांगितले.
११६ इन्फन्ट्री बटालियन (टेरिटोरिअल आर्मी) पेंश च्या अधिकारी आणि जवानांकडून भर्ती मध्ये आवश्यक सुरक्षा, गर्दी नियंत्रण, भर्तीमध्ये येणाऱ्या तरुणांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी व शौचालय, विश्वसनीय खाजगी खाद्य विक्रेत्याकडून माफक दरात उपलब्ध असलेले जेवण, विविध प्रकारच्या जागांप्रमाणे इच्छुक तरुणांसाठी गटआखणी, ठाकरे स्टेडियमपासुन ११६ इन्फन्ट्री बटालियन (टेरिटोरिअल आर्मी) पॅश मध्ये स्थित परीक्षा मैदानापर्यंत लष्करी वाहनांमार्फ़त परीक्षार्थ्यांचे दळणवळण इत्यादी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या संपूर्ण कालावधीत ९ राज्य आणि ४ केन्द्रशाषित प्रदेशांतुन मोठ्या संख्येत तरूण या भर्तीसाठी उपस्थित राहतील असा अंदाज आहे.
सोमवार दि.४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राबाहेरील तेलंगणा, गुजरात, गोवा, दादरा-नगर हवेली, दीव-दमण, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी मधील उमेदवार, मंगळवार दि. ५ रोजी आंध्र प्रदेश, बुधवार दि. ६ रोजी तामिळनाडू व केरळ, गुरूवार दि. ७ रोजी कर्नाटक, शुक्रवार दि. ८ व ९ रोजी राजस्थान (जिल्हानिहाय), तर रविवार दि. १० ते मंगळवार दि. १२ रोजी दरम्यान महाराष्ट्रातील जिल्हानिहाय उमेदवारांच्या निवड चाचण्या होणार आहे.
बुधवार दि.१३ ते शनिवार दि.१६ नोव्हेंबर दरम्यान कागदपत्रे तपासणी, ट्रेड टेस्ट, मेडिकल टेस्ट पात्र उमेदवारांच्या अन्य समस्यांसाठी तीन दिवस राखीव ठेवण्यात आले आहे.
लष्कराच्या 116 बटालियन साठी होत असलेल्या भरतीसाठी विविध राज्यातून कालपासूनच युवक देवळालीत पोचू लागले आहेत त्यांची राहण्याची कोठेही व्यवस्था नसल्याने रस्त्यावर, मंदिरात , शाळेच्या पटांगणात उघड्यावर हे लोक राहताना दिसत आहेत शिवाय त्यांच्या जेवणाची कोणती व्यवस्था आयोजकांकडून नसल्याने स्वखर्चाने हॉटेलमध्ये जेवण करावे लागत आहे
नाशिक रोड रेल्वे स्टेशन ते देवळाली कॅम्प असा रिक्षा प्रवास प्रति प्रवासी 30 रुपये असताना भरतीसाठी आलेल्या लोकांकडून प्रतिप्रवासी 60 रुपये वसूल केले जात असल्याचे युवकांकडून सांगण्यात आले संसरी नाक्याकडुन त्रिमुर्ती चौकाकाडे व त्रिमुर्ती चौकाकडुन संसरी नाक्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर सर्वप्रकारच्या वाहनांना वाहतूकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
१) संसरी नाक्याकडुन त्रिमुर्ती चौकाकाडे जाणारी वाहतूक हि संसरी नाका पासुन सिलेक्शन कॉर्नर येथुन उजवीकडे वळुन झेंडा चौक लेव्हिट मार्केट देवळाली कॅन्टोंमेंट हॉस्पिटल समोरून त्रिमुती चौक नविन बस स्टॅण्ड देवळाली कॅम्प कडे जातील. २) त्रिमुर्ती चौकाकडुन संसरी नाक्याकडे जाणारी वाहतूक हि त्रिमुर्ती चौकाकडे उजवीकडे वळुन देवळाली कॅम्प पोलीस