Real Life JUDAI | ‘जुदाई’ चित्रपटाची कथा घडली खऱ्या आयुष्यात : पत्‍नीने दीड कोटी घेऊन पतीला दिले प्रेयसीच्या ताब्यात!

भोपाळमधील कौटुंबिक न्यायालयातील घटनेची देशभर चर्चा
Real Life JUDAI
AI genreted Image
Published on
Updated on

भोपाळ: येथील एका घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ही घटना १९९७ ला आलेल्या जुदाई या चित्रपटाशी संबधित घटनेशी साधर्म्य असणारी आहे त्‍यामुळी ही चर्चा होत आहे. या चित्रपटात श्रीदेवी ही दीड कोटी रुपये घेऊनआपला पती अनिल कपूर याचा उर्मिला मांर्तोंडकर हिच्याशी विवाह लावून देते. असाच काहीसा प्रकार भोपाळ येथे घडला आहे. पण ही घटना कौटूंबिक न्यायालयाशी संबधित आहे.

सरकारी विभागात जुळले प्रेमप्रकरण

हे प्रकरण केंद्र सरकारच्या एका विभागाशी संबंधित आहे. तिथे कार्यरत असलेल्या ४२ वर्षीय अधिकाऱ्याचे त्याच्या महिला सहकाऱ्याशी प्रेमसंबंध सुरू झाले. विशेष म्हणजे, ही महिला अधिकारी ५४ वर्षांची आहे म्हणजे त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. या प्रेयसी मुळे संबधित अधिकारही पत्नीकडे आणि दोन लहान मुलींकडे दुर्लक्ष करू लागला. घरात दररोज होणाऱ्या वादांमुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. शेवटी प्रकरण भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात गेले तेथे तडजोड होऊन संबधित प्रेमिकेकडून एक अपार्टमेंट व 27 लाख रोख स्वीकारुन पतीला घटस्फोट देऊन प्रेयसीकडे कायमचे सोपवले. या "महागड्या घटस्फोटाची" शहरातील न्यायालयीन वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

प्रकरण गेले कोर्टात

या प्रकरणी संबधित अधिकाऱ्याच्या मुलीने मोठा निर्णय घेत न्यायालय गाठले. वडील व त्‍यांच्या प्रेयसीचे प्रकरण घरात पोहचले. त्‍यामुळे 16 व 12 वर्षाच्या दोन मुलींना मोठा मानसिक धक्का बसला. तसेच वारंवार घरात वादाचे प्रंसग होऊ लागले. यामुळे मोठ्या मुलीने थेट न्यायालयात अर्ज केला.

कौटुंबिक न्यायालयात कॉन्सिलिंग सुरू असताना, त्या प्रेयसीने पतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी पत्नीने एक धाडसी आणि अनपेक्षित अट ठेवली. तिने सांगितले की, जर तिला तिच्या आणि मुलीच्या भविष्यासाठी योग्य आर्थिक तरतूद करून मिळाली, तर ती पतीला सोडण्यास तयार आहे. तर संबधित अधिकारी याने सांगितले की त्‍यालाही प्रेमिकेबरोबरच राहण्यात शांती मिळते.

न्यायालयात झाली तडजोड

प्रेयसी संबधित अधिकाऱ्याच्या पत्नीला १.५ कोटींची मालमत्ता देईल व या बदल्यात पत्नी आपल्या पतीला घटस्फोट देऊन त्याच्या आयुष्यातून कायमची बाहेर पडणार. यामध्ये शहरात एक ड्युप्लेक्स अर्पाटमेंट व 27 लाख रोख द्यावे असे ठरले विषेश म्हणजे संबधित प्रेयसिने कोणतीही तक्रार न करता ही अट मान्य केली.

पत्‍नीने केले मुलींचे भविष्य सुरक्षित

जरी समाजता हा चर्चेचा विषय होत असला तरी संबधित पत्‍नीने घेतलेला हा धाडसी निर्णय मुलींच्या भविष्यासाठी सुरक्षीत ठरणार आहे. कारण पती प्रेयसीमुळे घरात लक्षच देत नव्हता तसेच दररोज वादाचे प्रसंग ठरलेले. त्‍यामुळे संबधित पत्‍नीने आर्थिक तडजोड करुन मुलींसाठी हा धाडसी निर्णय घेतला आहे.

समाजासाठी निर्णय न रुचणारा पण...

समुपदेशकाच्या मते ज्यावेळी नात्‍यांमधील भावना संपतात त्‍यावेळी जबरदस्ती एकमेकांच्या विरोधात राहण्यापेक्षा सन्मानजनक ‘जुदाई’ झालेली चांगली. समाजाला हा निर्णय रुचनार नाही किंवा विचित्र वाटेल पण मुलांच्या भविष्यासाठी व मानसिक स्वास्थ्यासाठी हा निर्णय योग्य ठरेल. आर्थिक बाबींचा विचार केला तर हे पाऊल योग्यच ठरले. नाते केवळ ओझे होते त्‍यावेळी शांतीसाठी वेगळे होणे चांगलेचजरी समाजता हा चर्चेचा विषय होत असला तरी संबधित पत्‍नीने घेतलेला हा धाडसी निर्णय मुलींच्या भविष्यासाठी सुरक्षीत ठरणार आहे. कारण पती प्रेयसीमुळे घरात लक्षच देत नव्हता तसेच दररोज वादाचे प्रसंग ठरलेले. त्‍यामुळे संबधित पत्‍नीने आर्थिक तडजोड करुन मुलींसाठी हा धाडसी निर्णय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news