IPL 2024 : आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्यावर पावसाचे सावट; कोण होणार क्वालिफाय?

RCBvsCSK
RCBvsCSK

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या प्लेऑफसाठी कोलकत्ता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स तसेच सनराईज हैदराबाद यांनी आपली जागा पक्की केली आहे. चौथ्या जागेसाठी शनिवारी (दि.18) बंगळुरुमध्ये (RCB vs CSK) आरसीबी विरुद्ध सीएसके सामना पार पडणार आहे. यामध्ये चांगल्या रनरेटने जिंकणाऱ्या संघाला प्लेऑफचे तिकीट मिळणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे संकट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे.

आकडेवारी काय सांगते?

आकडेवारीनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरला 18 मे रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रुतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा 18 धावांनी किंवा 18.1 षटकांत पराभव करावा लागेल. नाहीतर पहिल्या डावात 200 धावांची धावसंख्या करुन त्यांना शक्य तितक्या लवकर ऑलआउट केला पाहिजे.

फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चालू हंगामात प्लेऑफसाठी पात्र होण्याची संधी आहे. या सोबतच, 18 मे रोजी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी त्यांची अंतिम लढत निर्णायक असेल, ते पात्र ठरतात किंवा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणखी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. या हंगामात आरसीबीने 13 सामने खेळले आहेत आणि +0.387 च्या सरासरीसह 12 गुण आहेत. तसेच गुणतालिकेत सहाव्या क्रमांवर आहे, तर सीएसकेने एकूण 13 सामने खेळून +0.587 च्या सरासरीसह 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

जर सामन्यादरम्यान पाऊस पडला तर?

हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 18 मे रोजी पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. जर पाऊस पडलाच तर आरसीबीची प्लेऑफसाठी पात्र होण्याची शक्यताही धुऊन जाईल, कारण रनरेटमध्ये चेन्नई वरचढ असल्याने प्लेऑफमध्ये जाईल.

हवामान खात्याचा अहवाल :

भारतीय हवामान खात्यानुसार, शनिवारी (दि.18) बंगळुरुमध्ये पावसाची 73 टक्के शक्यता आहे. यामुळे आरसीबी समर्थकांनी पाऊस येवू नये अशी आशा करावी. पाऊस थांबेल आणि ते सामना खेळू शकतील, अन्यथा सीएसके प्लेऑफसाठी पात्र होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news