Rivaba Jadeja Minster : रविंद्र जडेजाच्या पत्नीची तीन वर्षात मंत्रीपदाला गवसणी; गुजरात सरकारमध्ये मोठी जबाबदारी

रिवाबाला राजकारणात येऊन फक्त ३ वर्षे झाली आहेत. त्यानंतर आता तिला गुजरातमधील भाजप सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळणार आहे.
Rivaba Jadeja Minster
Rivaba Jadeja Minster Pudhari Photo
Published on
Updated on

Rivaba Jadeja Minster :

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा ही २०२२ मध्ये भाजपच्या तिकीटावर जामनगरमधून आमदार म्हणून निवडून आली होती. आता तिच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. रिवाबाला राजकारणात येऊन फक्त ३ वर्षे झाली आहेत. त्यानंतर आता तिला गुजरातमधील भाजप सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळणार आहे.

रिवाबाचा जन्म ५ सप्टेंबर १९९० मध्ये झाला. तिनं गुजरातमधील राजकोट येथील इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे. १७ एप्रिल २०१६ मध्ये तिचे लग्न रविंद्र जडेजासोबत झालं. या लग्नाला अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते.

Rivaba Jadeja Minster
जसप्रीत बुमराह-रविंद्र जडेजा अव्वल स्थानी कायम

करणी सेनेची सदस्य

रिवाबा ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते हरी सिंह सोळंकी यांची नातेवाईक आहे. रिवाबा राजपूत समाजाची संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करणी सेनेची सदस्या देखील राहिली आहे. ती करणी सेना महिला शाखाची प्रमुख देखील होती. रिवाबानं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. रिवाबा ही जामनगर - सौराष्ट्र क्षेत्रात चांगलीच सक्रीय आहे. रविंद्र जडेजा हा मूळचा जामनगरचा आहे.

image-fallback
डोळे दान करून जडेजाच्या पत्नीने साजरा केला वाढदिवस!

५५ हजार पेक्षा जास्त मतांनी विजय

रिवाबा जडेजानं जामनगर उत्तरमधून निवडणूक लझवली होती. तिनं आम आदमी पक्षाचे उमेदवार करसन करमूर यांचा पराभव केला होता. तिनं हा पराभव ५३ हजार ५७० मतांनी केला. रिवाबासाठी रविंद्र जडेजा देखील प्रचाराच्या मैदानात उतरला होता. त्याचा रिवाबाला चांगला फायदा झाला.

याचबरोबर रिवाबाचा जनसंपर्क देखील चांगला असल्यानं तिला पहिल्याच निवडणुकीत यश मिळालं. आता पहिल्यांदा आमदार झाल्यावर तीन वर्षातच रिवाबाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news