राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रावण दहन

माधवदास पार्कमध्ये रामलीला कार्यक्रम उत्साहात
Dussehra celebrations 2024
राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले.
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशभरात शनिवारी (दि.१२) विजयादशमीचा उत्सव साजरा झाला. ठिक-ठिकाणी रावण दहन करण्यात आले. राजधानी दिल्लीतही वेगवेगळ्या ठिकाणी रामलीला कार्यक्रम आणि रावण दहन आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री धार्मिक लीला कमिटी यांच्यातर्फे आयोजित रामलीला कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले.

Dussehra celebrations 2024
आयुर्वेद ही जगातील सर्वात जुनी वैद्यकीय प्रणाली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

श्री धार्मिक लीला कमिटीतर्फे लाल किल्ल्याच्या माधवदास पार्कमध्ये विजयादशमीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण यांचे पूजन केले. तसेच रामलीला कार्यक्रम त्यांनी पहिला. त्यानंतर रावण, मेघनाद आणि कुंभकर्णाच्या पुतळ्यांचे दहन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

सोनिया गांधी, राहुल गांधी यांचाही रामलीला कार्यक्रमात सहभाग

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नव श्री धार्मिक लीला समिती आयोजित रामलीला कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आला.

चिराग दिल्लीमधील रामलीला कार्यक्रमात केजरीवाल यांचा सहभाग

चिराग दिल्लीमध्ये आयोजित दसरा उत्सव आणि रामलीला कार्यक्रमात आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहभाग घेतला. यावेळी दिल्लीचे मंत्री सौरव भारद्वाज उपस्थित होते.

Dussehra celebrations 2024
आसियान देशांमधील एकता खूप महत्‍वाची आहे : पंतप्रधान मोदी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news