

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात महाराष्ट्रासह विविध राज्यांतील खासदारांना अल्पोपहारासाठी निमंत्रित केले होते. यामध्ये महाराष्ट्र राज्यासह उत्तराखंड, चंदीगड, लडाख, गुजरात, मध्य प्रदेश आणि दिल्ली येथील खासदार आणि राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्य उपस्थित होते.
भारतीय नेव्हीच्या बँडची मेजवाणी
राष्ट्रपती भवनात आयोजित या कार्यक्रमात अल्पोपहारासह भारतीय नेव्हीच्या बँडचे अतिशय सुंदर सांगीतिक सादरीकरण होते. या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे यावेळी काही मराठी गाण्यांचे मधुर संगीत देखील ऐकता आले. यामध्ये सैराट चित्रपटातील "याड लागलं गं" या गाण्याने अनेकांना आकर्षित केले. या अनौपचारिक कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खासदारांनी संवाद साधला. यानिमित्त विविध राज्यांतील खासदारांना एकत्र येता आले आणि त्यांनाही एकमेकांशी संवाद साधता आला.
महाराष्ट्रातून यांची उपस्थिती
महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे तर खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत, डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. भागवत कराड, श्रीरंग बारणे, रजनी पाटील, फौजिया खान, भाऊसाहेब वाकचौरे, धनंजय महाडिक, रवींद्र वायकर, प्रियंका चतुर्वेदी, संजय देशमुख, डॉ. मेधा कुलकर्णी, मिलिंद देवरा, डॉ. प्रशांत पडोळे, विशाल पाटील, स्मिता वाघ, राजाभाऊ वाजे, निलेश लंके, बजरंग सोनवणे, कल्याण काळे, डॉ. शोभा बच्चाव, रवींद्र चव्हाण, डॉ. शिवाजी काळगे, भास्कर भगरे, बळवंत वानखेडे, डॉ. हेमंत सावरा, अनुप धोत्रे, बाळ्यामामा म्हात्रे, ॲड. गोवाल पाडवी उपस्थित होते.