Rare Two-Headed Snake| गुजरातमध्ये आढळला दुर्मिळ दोन तोंडांचा, चार डोळ्यांचा साप; वन्यजीव अभ्यासक चकित!

Wolf Snake कवड्या साप प्रजातीचा बिनविषारी साप, दोन डोकी चार डोळे असल्याने नैसर्गिक अधिवासाच जगणे कठीण, भारतातील पाचवी नोंद
गुजरातमध्ये सापडलेला दोन तोडांचा दुर्मिळ साप
गुजरातमध्ये सापडलेला दोन तोडांचा दुर्मिळ साप
Published on: 
Updated on: 

Rare Two-Headed Snake गुजरातमधून एक चकित करणारी बातमी समोर आली आहे. दाहोद जिल्ह्यातील धनपूर वनक्षेत्रात चार दिवसांपूर्वी एक दोन तोडांचा दुर्मिळ कवड्या साप Wolf Snake सापडला आहे. हा बिनविषारी जातीचा साप असून आकारही लहान असतो. वनरक्षकांनी या दुर्मिळ सापाला जीवनदान दिले आले आहे. या विचित्र आणि दुर्मिळ सापाला पाहून वन्यजीव रक्षकही आश्चर्यचकीत झाले आहेत हे साप बिनविषारी असून माणसांसाठी निरुपद्रवी असतात.

या बाबत अधिक माहिती अशी की दाहोद जिल्ह्यातील अगसवाणी गावात स्थानिक नागरिकांना हा साप प्रथम दिसला होता. त्यांनी तातडीने 'दाहोद प्रकृती मित्र मंडळ'च्या सदस्यांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून सापाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि पुढील निरीक्षण व देखभालीसाठी दाहोद येथे आणले.

एकाच शरीरावर दोन डोकी; 'बायसेफली'चा दुर्मिळ प्रकार

साधारण सहा इंच लांब असलेल्या या सापाचे एकाच शरीरावर दोन स्वतंत्र डोकी जोडलेली आहेत. दोन्ही डोक्यांना स्वतःचे डोळे असून ते स्वतंत्रपणे हालचाल करतात. वैज्ञानिक भाषेत या स्थितीला 'बायसेफली' (Bicephaly) म्हटले जाते. हा गर्भावस्थेदरम्यान होणारा एक दुर्मिळ शारीरिक दोष असतो, ज्यामध्ये गर्भाची वाढ सामान्यपणे न झाल्यामुळे एकाच शरीरावर दोन डोकी विकसित होतात. ही स्थिती सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये अत्यंत दुर्मिळ मानली जाते.

गुजरातमध्ये पहिलीच, तर भारतात पाचवी घटना

वन्यजीव रक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये दोन तोंडांचा साप आढळण्याची ही पहिलीच नोंद आहे. संपूर्ण भारतात अशा प्रकारची केवळ मोजकीच प्रकरणे नोंदवली गेली असून, हा भारतातील असा पाचवा साप ठरला आहे. यापूर्वी भारतात दोन नाग (Cobra) आणि तीन वुल्फ स्नेक अशा प्रकारचे दोन तोंड असलेले नोंदवले गेले आहेत.

नैसर्गिक अधिवासात जगणे अत्यंत कठीण

वाचवण्यात आलेल्या या सापाचे वय एक वर्ष असल्याचे वन्यअभ्यासकांचा अंदाज आहे. सध्या त्याची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष देखरेख ठेवली जात आहे. वन्यजीवांमध्ये दोन डोकी असणाऱ्या प्राण्यांना निसर्गात जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दोन्ही डोकी अन्न, हालचाल किंवा धोक्याच्या वेळी स्वतंत्रपणे विचार आणि प्रतिसाद देतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्या हालचालींमध्ये ताळमेळ राहत नाही. परिणामी, अन्न शोधणे, सरपटणे आणि शत्रूंपासून स्वतःचा बचाव करणे अशा प्राण्यांसाठी अत्यंत अवघड बनते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news