

नवी दिल्ली : राजस्थानमधील फलौदी जिल्ह्यात रविवारी एक हृदयद्रावक अपघात झाला. एक प्रवासी बस उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदार धडकल्याने 15 भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले. हे सर्व भाविक बिकानेरहून परतत असताना हा भीषण अपघात घडला.
पोलिस आयुक्त ओम प्रकाश पासवान यांनी वृत्तसंस्था पीटीआयला माहिती देताना सांगितले, फलौदी जिल्ह्यात रस्ते अपघातात 15 लोकांनी जीव गमावला आहे.