

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमध्ये विधानसभेच्या १९९ जांगासाठी आज (दि.२५) मतदान सुरू आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६८.२४ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. काही ठिकाणी अजूनही मतदार रांगेत उभा असून मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, काही भागांत आज हिंसक घटनाही घडल्या आहेत. (Rajasthan Election Voting)
मतदानाची वेळ संपल्यानंतर माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वसुंधरा राजे म्हणाल्या, शांततेने आणि भाजपच्या बाजूने मतदान केल्याबद्दल मी राज्यातील जनतेचे तसेच भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानते. आज राजस्थानच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला, विकासाला आणि विश्वासार्हतेला मान्यता दिली आहे. या निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजपचा नारा स्वीकारला असून काँग्रेसचा नारा नाकारला आहे, असा मला पूर्ण विश्वास आहे. (Rajasthan Election Voting)
राजस्थानमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६८.२४ टक्के मतदान झाले आहे. महत्वाच्या शहरांमधील टक्केवारी खालीलप्रमाणे –
अजमेरमध्ये 65.75%, अलवरमध्ये 69.71%, उदयपूरमध्ये 64.98%, पोकरणमध्ये 81.12%, हनुमानगढमध्ये 75.75%, ढोलपूरमध्ये 74.11%, झालवारमध्ये 73.37%, शिवालमध्ये 76%, 75.57%. सरदार शहरात 75.26%, 71.74%, सरदारपुरा येथे 61.30% मतदान. (Rajasthan Election Voting)