Raja raghuvanshi Murder Case
सोनम रघुवंशी व राजा रघुवंशीFile photo

Raja raghuvanshi Murder Case |राजा रघुवंशी यांच्या हत्‍येच्या अगोदरचा व्हिडीओ आला समोर : तिन्ही आरोपी करत होते पाठलाग (पाहा व्हिडीओ)

चुकून झालेल्‍या शूटींगमुळे आरोपी झाले व्हिडीओत कैद : इन्स्‍टाग्रामवर पोस्‍ट
Published on

नवी दिल्‍ली : इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. एम देवीसिंग नावाच्या व्हिडीओ ब्‍लॉगरने हा व्हिडीओ बनवताना सोनम रघुवंशी व तिच्यासोबत तीन मारेकरीही यामध्ये दिसत आहेत. त्‍याने या व्हिडीओ इन्स्‍टाग्रामवर पोस्‍ट केला असून यामध्ये अनवधानाने सोनम व तिने बोलवलेले मारेकरी दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये ट्रेकिंग करताना राजा सुर्यवंशी व त्‍याच्या बरोबर सोनम चालत आहेत. त्‍यांच्या बरोबर पाठीमागे हे तीन्ही आरोपी चालत जाताना दिसतात यामध्ये सोनमने पांढरा टी- शर्ट परिधान केला असून राजा हे ट्रॅकसूटमध्ये दिसत आहेत. विशेष बाब म्‍हणजे व्हिडीओ सुरु आहे हे लक्षात येतातच एक आरोपी आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्‍न करत आहे. हा व्हिडीओ शिलाँग येथील शोरा ट्रेकचा आहे. अगदी सहजपणे हा व्हिडीओ शूट झाला आहे.

Raja raghuvanshi Murder Case
Raja Raghuvanshi murder case | राजा रघुवंशींच्या खुनासाठी मारेकरी कसे झाले तयार?पोलीस तपासात धक्‍कादायक खुलासा

या पोस्‍ट करणाऱ्या युझरचे म्‍हणने आहे की आमच्याकडे असलेल्‍या ३६० डिग्री अँगलच्या कॅमेऱ्यात हा व्हिडीओ शूट झाला आहे. यामध्ये कोणतेही ठरवून शूट केले नव्हते पण आम्‍ही कच्चे फुटेज जतन केले होते, जे आम्ही घरी परतल्यावर पूर्णपणे पाहिले नव्हते नंतर जेव्हा ते पाहिले तेव्हा लक्षात आले की हा व्हिडीओ एका दुर्देवी घटनेशी जोडला आहे. तसेच आमच्याकडे जे काही होते ते आम्ही पोस्ट केले आहे. जर पोलिसांना किंवा संबंधित अधिकाऱ्यांना संपूर्ण फुटेज किंवा आणखी काही हवे असेल तर आम्ही कोणत्याही प्रकारे मदत करण्यास तयार आहोत. असेही ते म्‍हटले आहे.

Raja raghuvanshi Murder Case
Raja Raghuvanshi murder case | सोनमचे कुटुंब काळ्या जादूच्‍या आहारी : राजा रघुवंशीच्या आईचा आरोप

दरम्‍यान हनिमूनसाठी मेघालयमध्‍ये गेले असता पत्नी सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi ) हिने तिघांच्‍या मदतीने पतीचा काटा काढल्‍याचे पोलीस तपासात स्‍पष्‍ट झाले आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील तिघांना अटक करण्यात आली आहे. सोनमचे वडील देवी सिंह यांनी आपल्‍या मुलीवर लावण्‍यात आलेले आरोप फेटाळले आहेत. तसेच त्‍यांनी मेघालयच्‍या पोलिसांवर गंभीर आरोपही केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news