Municipal Corporation of Delhi । भाजपचे राजा इक्बाल सिंग दिल्लीचे नवे महापौर, काँग्रेस उमेदवाराला फक्त ८ मते

New Delhi News : आपचा निवडूकीवर बहिष्‍कार
New Delhi News
राजा इक्बाल सिंग(Image Source X)
Published on
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजा इक्बाल सिंह १३३ मते घेत विजयी झाले. ते या अगोदर विरोधी पक्षनेते होते. काँग्रेस उमेदवार मनदीप सिंग यांना फक्त ८ मते मिळाली. एक मत अवैध घोषित करण्यात आले. 'आप'ने आधीच निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

बेगमपूर प्रभागातील भाजपचे नगरसेवक जय भगवान यादव यांची उपमहापौरपदी निवड झाली. उपमहापौर पदासाठी काँग्रेसने अबुल फजल अरिबा खान यांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीत भाजपचा विजय आधीच निश्चित होता, कारण भाजपकडे ११७ आणि काँग्रेसकडे फक्त ८ नगरसेवक होते. एमसीडीच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत २५० नगरसेवकांव्यतिरिक्त, दिल्लीचे १० खासदार (लोकसभेचे सात आणि राज्यसभेचे तीन) आणि १४ आमदार देखील मतदान करतात.

New Delhi News
राजधानी दिल्ली महिलांसाठी अधिक सुरक्षित होणार, अर्थसंकल्पात घोषणा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news