राहुल नवीन यांची ईडीच्या संचालकपदी नियुक्ती

राहुल नवीन 2 वर्षांसाठी जबाबदारी सांभाळणार
New ED Director Rahul Navin
राहुल नवीन Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंमलबजावणी संचालनालयाचे तपास यंत्रणा (ईडी) विशेष संचालक राहुल नवीन यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी (दि.14) आर्थिक प्रकरणांवरील केंद्रीय तपास संस्था अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पूर्णवेळ संचालकाची नियुक्ती केली आहे. तपास संस्थेचे विशेष संचालक राहुल नवीन यांची अंमलबजावणी संचालनालयाचे नवे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते या पदावर 2 वर्षे राहतील.

राहुल नवीन हे भारतीय महसूल सेवेचे (आयकर) 1993 च्या बॅचचे अधिकारी आहेत. यापूर्वीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी तपास यंत्रणेच्या विशेष संचालकपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी अर्थमंत्र्यांचे सचिव म्हणूनही काम केले आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये त्यांना ईडीचे कार्यकारी प्रमुख बनवण्यात आले होते.

नवीन यांचे विशेष ट्रॅक रेकॉर्ड

विशेष संचालक बनण्यापूर्वी राहुल नवीन प्रभारी संचालक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते तत्कालीन संचालक संजय मिश्रा यांच्यासोबत एजन्सीत काम करत होते. ते एक ठोस आणि उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड असलेली व्यक्ती आहे. याआधी राहुल नवीन यांनी ईडीमध्येच अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. आर्थिक गुन्हे आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित अनेक प्रकरणांच्या तपासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यासोबतच ईडीचे विशेष संचालक म्हणून त्यांनी अनेक मोठ्या प्रकरणांच्या तपासातही मोठी भूमिका बजावली आहे.

कोण आहे राहुल नवीन?

बिहारचे रहिवासी असलेले नवीन हे 1993 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. याआधी त्यांची ईडीचे प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी ईडीमध्ये मुख्य दक्षता अधिकारी म्हणूनही काम केले आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांची ईडीचे विशेष संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबर 2019 पासून ते या पदावर कार्यरत आहेत. नवीन यांना 2017 मध्ये आयकर आयुक्त बनवण्यात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news