पुढारी ऑनलाईन डेस्क : "काँग्रेस पक्षाला गुजरातमध्ये सत्तेत येवून सुमारे ३० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. मी राज्यात २००७, २०१२, २०१७, २०२२, २०२७ च्या विधानसभा निवडणुकांवेळी आलो तेव्हा केवळ निवडणुकीवर चर्चा होते; पण प्रश्न निवडणुकांचा नाही, असे स्पष्ट करत गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार केव्हा येणार? या प्रश्नाचे उत्तर पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी आज (दि. ८) अहमदाबाद येथे दिले. ते पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
या वेळी राहुल गांधी म्हणाले की, "गुजरातमध्ये आम्हाला सत्तेत येऊन सुमारे ३० वर्षांपेक्षा अधिक का लोटला आहे. मी २००७, २०१२, २०१७, २०२२, २०२७ च्या विधानसभा निवडणूक प्रचारावेळी आला तेव्हा केवळ निवडणुकीवर चर्चा होते; पण प्रश्न निवडणुकांचा नाही. आम्ही जाेपर्यंत आमच्या जबाबदार्या पार पाडणार नाही, ताेपर्यंत गुजरातचे लोक आपल्याला निवडून देणार नाहीत. त्यामुळे आम्ही आमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्हाला सत्तेत आणण्यासाठी गुजरातच्या लोकांना सांगू नये.आपण आपल्या जबाबदार्या पूर्ण करु त्या दिवशी गुजरातचे लोक काँग्रेस पक्षाला पाठिंबा देतील, याची मी तुम्हाला हमी देतो," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गुजरात काँग्रेसमध्ये पक्षात दोन गट आहेत. एक जनतेसोबत आहे, तर दुसरा जनतेपासून दूर आहे. जनतेसोबत असणार्या गटाच्या हृदयात काँग्रेसची विचारसरणी आहे. तर जनतेपासून दूर असणारे निम्मे भाजपमध्ये सामील झाले आहेत. जोपर्यंत आपण या दोघांना वेगळे करत नाही तोपर्यंत गुजरातचे लोक आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत. काँग्रेस पक्षाला २०-३० लोकांना बाहेर काढावे लागले तरी ते करण्यास अजिबात संकोच करू नये, असेही राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले.
गुजरातमध्ये काँग्रेस भाजपची 'बी टीम' नसून 'खरा पर्याय' असला पाहिजे, असे स्पष्ट करत काँग्रेसला गुजरातमध्ये तीन दशकांपासून सरकार स्थापन करता आले नसले तरी राज्यात त्यांना अजूनही चांगली मते मिळत आहेत. काँग्रेस पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत पाच टक्के वाढ झाली तर ते राज्यातील सत्ताधारी भाजपच्या जवळ जातील आणि तेलंगणातील गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २२ टक्क्यांनी मतांची टक्केवारी वाढवता आली, असेही राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केले.