

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. २१ आणि २२ एप्रिल रोजी अमेरिकेतील रोड आयलंड येथील ब्राउन विद्यापीठाला ते भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान तिथले प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी राहुल गांधी संवाद साधतील.
दरम्यान, रोड आयलंडला भेट देण्यापूर्वी राहुल गांधी एनआरआय समुदायाशी तसेच इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी भेटणार आहेत. काँग्रेस प्रवक्ते पवनखेडा यांनी राहुल गांधींच्या या दौऱ्याबाबत माहिती दिली.