Rahul Gandhi : दिल्‍लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'इंडिया' आघाडीचा माेर्चा, सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल

मोर्चात इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्‍यांचा सहभाग, विविध याचिकांवर उद्या होणार सुनावणी
Rahul Gandhi Supreme Court March :
File Photo.
Published on: 
Updated on: 

Rahul Gandhi Supreme Court March : लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज (दि. १२) 'इंडिया' (INDIA) आघाडीने कनॉट प्लेस ते सर्वोच्च न्यायालयपर्यंत असा मोर्चा काढला. यानंतर मतदार यादी 'एसआयआर' (विशेष सखोल पुनरावलोकन) प्रक्रियेतील वादाबाबत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सौगत रॉय, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांच्या नावाने सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. 'सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन' (SCBA) च्या याचिकांसह अशा अनेक याचिकांवर मंगळवारी (दि. १३) सुनावणी होणार आहे.

विरोधी पक्षांचा सर्वोच्च न्यायालयाकडे मोर्चा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाकडे नियोजित मोर्चा सुरू केला. मोठ्या संख्येने विरोधी पक्षांचे नेते सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने गेले. मोर्चात 'इंडिया' आघाडीतील नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, आरजेडी नेते तेजस्वी यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि इतरांचा समावेश होता. यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात निदर्शने केली.

Rahul Gandhi Supreme Court March :
Rahul Gandhi: ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात... राहुल गांधीचा गौप्यस्फोट; काय दिला रिप्लाय?

राहुल गांधींनी दिली होती आंदोलनाची हाक

निवडणूक आयोगाच्या कामकाजाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस खासदाराने कनॉट प्लेस ते सर्वोच्च न्यायालय अशा 'चलो दिल्ली' (दिल्लीकडे कूच) आंदोलनाची हाक दिली होती. या मुद्द्यावर विरोधी पक्षाच्या खासदारांना भेटण्यासाठी भारताच्या सरन्यायाधीशांची (CJI) संमती मिळाली नसतानाही विरोधी पक्षांनी हे आंदोलन पुढे चालू ठेवले.मोर्चापूर्वी राहुल गांधींनी या आंदोलनाबाबत पत्रकार परिषद घेतली. 'एक्स' (X) वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले: "लोकशाहीसाठी मोर्चा. न्यायासाठी मोर्चा. चलो दिल्ली."

Rahul Gandhi Supreme Court March :
Rahul Gandhi : सर्व तरुणांसह आम्हा सर्वांना अटक करा : राहुल गांधींनी जाहीर केला CEC विरोधातील तरुणांच्‍या आंदोलनास पाठिंबा

सरन्यायाधीशांनी दिला होता भेटीस नकार

सरन्यायाधीशांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटण्यास नकार दिला होता. सोमवारी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी नमूद केले की, प्रत्येक भारतीय नागरिकाला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची दारे सर्वांसाठी खुली आहेत.'इंडिया' आघाडीच्या भेटीच्या विनंतीला प्रतिसाद देताना सरन्यायाधीशांनी सांगितले की, त्यांना रविवारी एक पत्र मिळाले होते. त्यांनी त्याच रात्री त्याला उत्तर दिले होते; त्यात शिष्टमंडळाला भेटणे का शक्य होणार नाही, याचे कारण स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयाची दारे सर्वांसाठी खुली असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news