Rahul Gandhi On Election Commision | "पिक्चर अभी बाकी है!" : राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल..

Aggressive Statement | भाजपसोबत संगनमताचा गंभीर आरोप, निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांनंतर राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाले आहेत.
Rahul Gandhi On Election Commision
Rahul Gandhi Statement On ECPudhari File Photo
Published on
Updated on

Rahul Gandhi Aggressive Statement

नवी दिल्ली : निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांनंतर राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाले आहेत. मंगळवारी 'पिक्चर अभी बाकी है' म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला इशारा दिला आणि आम्ही संविधानाचे रक्षण करत आहोत मात्र निवडणूक आयोग 'एक व्यक्ती, एक मत' हे कर्तव्य बजावत नाही, असे म्हणत आयोगावर टीकाही केली.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपशी संगनमत करून निवडणूक आयोगाने मतदार यादीत छेडछाड केल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या वर्षी कर्नाटक आणि महाराष्ट्रात हे षड्यंत्र घडले होते आणि आता 'एसआयआर'द्वारे बिहारमध्ये त्याची पुनरावृत्ती करण्याची तयारी सुरू आहे.

Rahul Gandhi On Election Commision
New Delhi Dust Storm | राजधानी दिल्‍लीवर धुळीची चादर

ही फक्त एक-दोन जागांची गोष्ट नाही तर हे अनेक जागांवर घडले आहे. या गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणि नियोजनानुसार केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाला याची जाणीव आहे. पूर्वी आमच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते, आता पुरावे आहेत, असेही ते म्हणाले.

Rahul Gandhi On Election Commision
Delhi crime news: रात्री पत्नीचा फोन खणाणला, पतीने विचारला जाब; जंगलात सापडला व्यावसायिकाचा मृतदेह, प्रकरण काय होतं?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news