Ransom Case | अमेरिकन नागरिकाकडे ४ लाख डॉलर्सची खंडणी मागितल्याचा पंजाबच्या पोलिसावर आरोप

‘एफबीआय’च्या ‘ऑपरेशन हार्ड बॉल’अंतर्गत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीवर प्रकाशझोत
Ransom Case |
Ransom Case | अमेरिकन नागरिकाकडे ४ लाख डॉलर्सची खंडणी मागितल्याचा पंजाबच्या पोलिसावर आरोप
Published on
Updated on

लॉस एंजेलिस/जालंधर; वृत्तसंस्था : पंजाब पोलिसांच्या एका स्टेशन हाऊस ऑफिसरवर अमेरिकेतील अनिवासी भारतीय कुटुंबाकडून तब्बल चार लाख डॉलर्स (सुमारे ३.३ कोटी रुपये) खंडणी मागितल्याचा धक्कादायक आरोप अमेरिकेची केंद्रीय तपास संस्था ‘एफबीआय’ने केला आहे. पैसे न दिल्यास भारतात खुनाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी या अधिकाऱ्याने दिली होती. अमेरिकन अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या ‘ऑपरेशन हार्ड बॉल’ या बहुराष्ट्रीय मोहिमेदरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे.

लॉस एंजेलिसमधील पत्रकार परिषदेत अमेरिकेचे सहायक वकील बिल एसेली यांनी सांगितले की, पंजाबमधील पोलिस अधिकारी गुरिंदरजितसिंग नागरा हा ‘जग्गू भगवानपुरिया’ टोळीशी जोडलेला होता. त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला टार्गेट केले. टोळीचा सदस्य गुरलाल सिंग याने सुरुवातीला पीडितेला धमकी दिली आणि नंतर तिची माहिती पंजाबमधील या पोलिस अधिकाऱ्याकडे सोपवली.

चौकशीचे आदेश आणि बदली

हा प्रकार समोर आल्यानंतर पंजाब पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. जालंधर रेंजचे डीआयजी नवीन सिंगला यांनी सांगितले की, त्यांनाही ‘एफबीआय’च्या संकेतस्थळावरून या प्रकरणाची माहिती मिळाली. तपास नि:पक्ष व्हावा म्हणून संबंधित एसएचओ गुरिंदरजित सिंगची तातडीने पोलिस लाईनमध्ये बदली करण्यात आली आहे. तसेच, होशियारपूरबाहेर या प्रकरणाची चौकशी सोपवली आहे.

गंभीर आरोप : पंजाबच्या एसएचओ गुरिंदरजित सिंगने अमेरिकेतील कुटुंबाला भारतात खुनाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून ४ लाख डॉलर्सची खंडणी मागितल्याचा ‘एफबीआय’चा आरोप आहे.

आंतरराष्ट्रीय मोहीम : अमेरिकेने ‘ऑपरेशन हार्ड बॉल’अंतर्गत भारत आणि इतर देशांत सक्रिय असलेल्या जग्गू भगवानपुरिया आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सिंडिकेटच्या ३७ आरोपींवर गुन्हे नोंदवले आहेत.

भ्रष्ट युती : हे गुन्हेगारी सिंडिकेट भारतातील भ्रष्ट पोलिस आणि शासकीय अधिकाऱ्यांचा वापर करून लोकांना खोट्या केसेसमध्ये अडकवून धमकावत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news