धक्‍कादायक! पंजाबमध्‍ये पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या घालून हत्या

तरनतारन गावात दाेन गटात हाणामारी, ग्रामस्‍थांचा एका पाेलीस कर्मचार्‍यावरही प्राणघातक हल्‍ला
Punjab cop shot dead
ग्रामस्‍थांनी केलेल्‍या गाेळीबारात पोलीस उपनिरीक्षकांचे नाव चरणजीत सिंग शहीद झाले. (Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ग्रामस्‍थांमधील वाद सोडविण्‍यासाठी गेलेल्‍या एका पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तर अन्‍य एका पोलीस कर्मचार्‍यावर प्राणघातक हल्‍ला करण्‍यात आला. ही धक्‍कादायक घटना बुधवारी (दि. ९) रात्री उशिरा पंजाबमधील तरनतारन गावात घडली. चरणजीत सिंग असे गाेळीबारात मृत्‍युमुखी पडलेल्‍या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. जखमी पोलिस कर्मचारी जसबीर सिंगवर यांच्‍यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आम आदमी पार्टीचे विद्यमान सरपंच आणि इतरांविरुद्ध श्री गोइंदवाल साहिब पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामस्‍थांमधील वाद पाेलीस उपनिरीक्षकाच्‍या जीवावर बेतला

चरणजित सिंग हे श्री गोइंदवाल साहिब पोलीस ठाण्यात तैनात होते. कोट मोहम्मद खान गावातील सरपंच कुलदीप सिंग यांच्या मुलाचा त्याच गावातील अर्शदीप सिंगशी सुमारे दहा दिवसांपासून वाद सुरू होता. या वादावरून दोन्ही गटांमध्‍ये हाणामारी झाली. विरोधी पक्षांनी आपचे सरपंच कुलदीप सिंग आणि इतरांविरुद्ध श्री गोइंदवाल साहिब पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. बुधवारी (दि. ९) सकाळी ११ वाजता दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली. वाद सोडवण्याची वेळ संध्याकाळी ४ वाजता निश्चित करण्यात आली होती, परंतु सरपंच गटाच्या गुंडगिरीविरुद्ध विरोधी पक्षाने पोलिस हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार दाखल केली. सकाळी ९.३५ च्या सुमारास, कोट मोहम्मद खान गावात दोन्ही पक्ष पुन्हा एकमेकांशी भिडले. जेव्हा पोलीस उपनिरीक्षक चरणजित सिंग यांनी वाद सोडवण्यासाठी सरपंच गटाला मागे हटण्यास सांगितले तेव्हा आरोपींनी त्‍यांचे रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतले. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. चरणजित सिंग गंभीर जखमी झाले. आरोपीने एएसआय जसबीर सिंग यांना मारहाण करून त्यांचा हात तोडला. उपचाराला नेण्‍यापूर्वी चरणजित सिंग यांचा मृत्‍यू झाला.

गोळ्यांचा आवाज ऐकून अधिकारी मागे हटले

गाेळीबाराची घटना डीएसपी अतुल सोनी आणि पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक प्रभजीत सिंग गिल यांच्या उपस्थितीत घडली. गोळ्यांचा आवाज ऐकून दोन्ही अधिकारी मागे हटले. पाेलीस उपनिरीक्षकचरणजित सिंग आणि एएसआय जसबीर सिंग यांना एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.चरणजित सिंग यांचा उपचारापूर्वीच मृत्‍यू झाल्‍याचे डाॅक्‍टरांनी घोषित केले.

"प्राणाची आहुती देणाऱ्या शूर अधिकाऱ्याला सलाम"

या घटनेबाबत पंजाबचे पोलीस महासंचालकांनी सोशल मीडिया एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आमच्या शहीद सब-इन्स्पेक्टर चरणजित सिंग यांच्यासाठी २ कोटी रुपयांची घोषणा केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री पंजाब भगवंत मान यांचे आभार. तरनतारनमध्ये कर्तव्यावर असताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूर अधिकाऱ्याला सलाम. त्यांचे अफाट धैर्य आणि सेवेप्रती असलेली वचनबद्धता नेहमीच लक्षात ठेवली जाईल. पंजाब पोलिस त्यांच्या शहीदांची आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेतात. पंजाब सरकार १ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देईल. पंजाब पोलिस कल्याण विमा कंपनीकडून एचडीएफसी बँकेकडून १ कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाईल. आम्ही आमच्या शहीदांच्या पाठीशी उभे आहोत."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news