दिल्ली विद्यापीठ | LLBच्या अभ्यासक्रमात 'मनुस्मृती'चा समावेश नाही - केंद्राची माहिती

केंद्र सरकार राज्यघटनेशी कटिबद्ध - धर्मेंद्र सिंग
delhi university introduces manusmriti
दिल्ली विद्यापीठाच्या कायद्याच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विद्यापीठ अंतर्गत कायदा विभागाच्या अभ्यासक्रमात 'मनुस्मृती' समावेश करण्याचा प्रस्ताव कुलगुरू कुलगुरू डॉ. योगेश सिंग यांनी फेटाळला आहे. या संदर्भात मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली आहे.

दिल्ली विद्यापीठातील कायदा विभागाने अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश केलेला होता होता. कायद्याच्या पाच वर्षांच्या आणि तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी (LLB) पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात मनुस्मृती समाविष्ट करण्यात आली होती.

Summary
  • विद्यापीठातील कायदा अधिविभागाच्या LLBच्या अभ्यासक्रमात मनुस्मृती शिकवण्याचा प्रस्ताव

  • कायदा विभागाच्या डीन यांच्याकडून प्रस्तावाचे समर्थन

  • प्राध्यापकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका

  • कुलगुरू योगेश सिंग यांनी प्रस्ताव फेटाळला

नेमका प्रस्ताव काय होता?

प्रथम वर्षांच्या अभ्यासक्रमात Medhatithi's Concept of State and Law या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. मेधातिथी मनुस्मृतीचे सर्वांत जुने आणि प्रसिद्ध भाष्यकार मानले जातात. या विषयासाठी Manusmriti with the 'Manubhasya' of Medhatithi, by GN Jha, and Commentary of Manu Smriti - Smritichandrika, by T Krishnaswami Iyer ही दोन पुस्तके अभ्यासाण्यासाठी सुचवण्यात आली होती. विद्यापीठाचे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पोर्टलवर अभ्यासक्रमातील हे बदल गुरूवारी जाहीर करण्यात आले होते, असे बार अँड बेंचच्या बातमीत म्हटले आहे.

कुलगुरूंनी प्रस्ताव फेटाळला

पण यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला. त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रधान यांनी यावर खुलासा केला. ते म्हणाले, "काही प्राध्यापकांनी हा प्रस्ताव सादर केला होता. पण कुलगुरूंनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. हा प्रस्ताव विद्या परिषदेत आल्यानंतर त्याला मान्यता देण्यात आलेली नाही. आम्ही सर्वच भारतीय राज्यघटनेबद्दल कटिबद्ध आहोत. त्यामुळे कोणत्याही संहितेतील वादग्रस्त भाग अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रश्न येत नाही."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news