

Professor Suspended: दिल्लीतील जामिय मिलिया इस्लामिया विद्यापीठातील प्राध्यापकाला प्रश्नपत्रिकेत कथित वादग्रस्त प्रश्न समाविष्ट केल्याबद्दल निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. याबाबतची सोशल मीडिया पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. यावरून सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला आहे. विद्यापीठानं या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अंतर्गत समिती देखील स्थापन केली आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
बीए ऑनर्सच्या सोशल वर्कच्या पहिले सेमिस्टरच्या परीक्षेत १५ मार्कांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सध्या गदारोळ सुरू झाला आहे. या प्रश्नपत्रिकेचे टायटल हे भारतातील सामाजिक प्रश्न असं होतं.
या प्रश्नपत्रिकेत भारतात मुस्लीम अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अत्याचाराबाबत उदाहरणासह चर्चा करा असा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न विरेंद्र बालाजी शहारे यांनी टाकला होता. त्यानंतर याबाबत तक्रार झाली. या तक्रारीनंतर विद्यापीठानं याची गंभीर नोंद घेत ही हा फॅकल्टी मेंबरचा निष्काळजीपणा असल्याचं म्हटलं आहे.
विद्यापीठाच्या अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियानुसार, 'या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. जोपर्यंत या समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत प्राध्यपकांचे निलंबन करण्यात आलं आहे.' हा निर्णय संस्थेची शिस्त आणि शैक्षणिक जबाबदारीबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही हे दर्शवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे असं अधिकाऱ्यानं सांगितलं.
या निलंबन पत्रावर विद्यापीठाचे रजिस्टार सीए शेख सैफुल्ला यांची स्वाक्षरी आहे. हे निलंबन पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. त्यात प्राध्यापकाचं निलंबन हे पुढचे आदेश मिळेपर्यंत केल्याचं लिहिलेलं दिसतंय.
याचबरोबर प्रोफेसर शहारे यांना त्यांच्या निलंबन काळात नवी दिल्लीतील हेड क्वार्टर परवानगीशिवाय सोडता येणार नाही असं देखील म्हटलं आहे. या निलंबन पत्रात पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर दाखल करण्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. मात्र अधिकाऱ्यांनी सध्या तरी प्राध्यापकाविरूद्ध एफआयआर दाखल करण्याचा कोणतीही हेतू नसल्याचं सांगितलं.
अधिकारी म्हणाले, 'या प्रकरणात फॅकल्टी मेंबरविरूद्ध कोणतीही तक्रार दाखल करण्याचा हेतू नाहीये. या प्रकरणाचा अंतर्गत समितीकडून तपास करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रश्न पत्रिकेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी अत्यंत कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी देखील या प्रश्नपत्रिकेचा फोटा शेअर केला होता. त्यानंतर या प्रकरणाला चांगलीच हवा मिळाली आहे.
गुप्ता आपल्या ट्विटमध्ये लिहितात की, 'जामिया मिलिया इस्लामिया हे केंद्रीय विद्यापीठ आहे. यात सर्वत समाजाचे विद्यार्थी शिकतात. या प्रश्नाचा दुष्ट उद्येश दिसतोय.'
दरम्यान, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठानं याबाबत कोणताही जाहीर वक्तव्य केलेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी समिती हा प्रश्न कसा काय फ्रेम करण्यात आला अन् त्याला मान्यता कशी काय मिळाली. या प्रकरणात विद्यापीठ परीक्षा नियमांचे उल्लंघन झालं आहे का याचा देखील तपास केला जाणार आहे. या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणात पुढं कोणती कारवाई करायची हे ठरवण्यात येणार आहे.