प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात

वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून अधिकृत घोषणा
New Delhi News
प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणूक रिंगणातPudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. राहुल गांधींच्या राजीनाम्याने ही जागा रिक्त झाली होती तेव्हाच प्रियंका गांधी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यानिमित्ताने प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

आम्हालाही अटक करा! राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा यांची सरकारवर टीका

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर त्यानी वायनाडच्या जागेवरुन राजीनाना दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. राजीनामा दिला असला तरी वायनाडसोबत मी कायम जोडला आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते आणि तेव्हाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रियंका गांधी यांची उमेदवारीही जाहीर केली होती.

New Delhi News
कुपोषणरुपी दैत्याचा नाश करण्याचा प्रियंका गवळी यांनी घेतला ध्यास !

प्रियंका गांधी पहिल्यांदा निवडणूक रिंगणात

वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने गांधी-नेहरू परिवारातील सदस्य असलेल्या प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. आतापर्यंत कुठलीही निवडणूक त्यांनी लढवली नाही, केवळ पक्षात सरचिटणीस म्हणून त्या जबाबदारी सांभाळत होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news