

PM Modi Address To Nation: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी देशाला संबोधित करणार आहेत, असे वृत्त ANIने दिले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या विषयावर संबोधन करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यापूर्वी जेव्हा जेव्हा पंतप्रधानांनी अशा प्रकारे देशाला संबोधित केले आहे, तेव्हा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे आजच्या त्यांच्या संबोधनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या भाषणाचा विषय काय असेल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
पंतप्रधान मोदी संध्याकाळी पाच वाजता ‘राष्ट्राला उद्देशून’ भाषण देतील. मात्र, मोदी जीएसटीमध्ये केलेल्या सुधारणांबाबत बोलतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सोमवार, २२ सप्टेंबरपासून देशभरात जीएसटी २.० चे नवे दर लागू होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, रविवारी, संध्याकाळी ५ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ही माहिती समोर येताच सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. असे मानले जात आहे की, पंतप्रधान मोदी जीएसटीसंदर्भात माहिती देऊ शकतात. २२ सप्टेंबरपासून जीएसटीचे नवीन दर लागू होत आहेत. दिवाळीपूर्वी सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळेच, पंतप्रधान या निर्णयाची सविस्तर माहिती देतील, असाही अंदाज काही जण व्यक्त करत आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी (२० सप्टेंबर) गुजरातच्या भावनगरमधून देशाला एक महत्त्वाचा संदेश दिला होता. त्यांनी म्हटले होते की, 'इतर देशांवर अवलंबून राहणे हा देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे.' त्यामुळे, काही जाणकार आणि सोशल मीडियावरील एका वर्गाचे म्हणणे आहे की, पंतप्रधान याच विषयाशी संबंधित काही घोषणा करू शकतात.