नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यामध्ये पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर असणार आहेत. यामध्ये २१ आणि २२ ऑगस्ट रोजी पोलंडला तर २३ ऑगस्ट रोजी युक्रेनला भेट देणार आहेत. जवळपास ३ दशकांनंतर भारतीय पंतप्रधान युक्रेनला भेट देणार आहेत. तसेच ४५ वर्षांनंतर पोलंडला भेट देणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी मॉस्कोमध्ये झालेल्या भेटीनंतर एका महिन्यानंतर पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा होत आहे.
दरम्यान, पोलंडच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान भारतीय समुदायातील लोकांशी आणि व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत. तसेच पंतप्रधान पोलंडमधील स्मारकांनाही भेट देणार आहेत. यामध्ये कोल्हापूर आणि आणि जामनगरचे ऐतिहासिक नाते आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौऱ्याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, "आमच्या द्विपक्षीय संबंधांच्या इतिहासात भारतीय पंतप्रधानांची युक्रेनची ही पहिलीच भेट आहे. या भेटीदरम्यान, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, युक्रेन आणि भारत यांच्यात अनेक महत्वाच्या दस्तऐवजांवर स्वाक्षऱ्या होतील, अशी अपेक्षा आहे." असेही निवेदनात म्हटले आहे.