राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून रामनवमीच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा

President of India | प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सव सर्वांच्या जीवनात नवीन चेतना घेऊन येवोः पंपप्रधान
President Of India
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदीFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा रामनवमीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, रामनवमीच्या पवित्र सणानिमित्त सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. हा सण धर्म, न्याय आणि कर्तव्याचा संदेश देतो. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांनी मानवजातीसाठी त्याग, वचनबद्धता, सौहार्द आणि शौर्याचे सर्वोच्च आदर्श मांडले आहेत. त्यांची रामराज्याची संकल्पना आदर्श मानली जाते. याप्रसंगी सर्व देशवासीयांनी विकसित भारताच्या निर्मितीसाठी एकत्रितपणे काम करण्याची प्रतिज्ञा घ्यावी अशा शुभेच्छा देते, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुभेच्छा देताना म्हणाले की, प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाचा हा पावन प्रसंग आपल्या सर्वांच्या जीवनात नवीन चेतना आणि उत्साह घेऊन येवो, जो सशक्त, समृद्ध आणि समर्थ भारताच्या संकल्पाला सातत्याने नवीन ऊर्जा प्रदान करो. तर रामनवमीचा पवित्र सण तुम्हा सर्वांच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, अशा शुभेच्छा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news