महाराष्ट्राच्या ‘गुरु’-‘शिष्या’च्या जोडीचा ‘द्रौणाचार्य’-‘अर्जुन’ पुरस्काराने सन्मान

National Sports Award : डी. गुकेश, मनू भाकरसह ४ जणांना खेलरत्न, ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार
National Sports Award
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान
Published on
Updated on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवनात शुक्रवारी (दि.१७) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते क्रीडा जगतातील नामवंत खेळाडूंचा गौरव करण्यात आला. दोन ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी. गुकेश, भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग, पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता उंच उडीपटू प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. महाराष्ट्रातून पॅरीस ऑलिंपिक स्पर्धेतील कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कार आणि त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रौणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. काही दिवसांपूर्वी केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाने ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४’ जाहीर केले होते.

महाराष्ट्राच्या ‘गुरु’-‘शिष्या’च्या जोडीचा ‘द्रौणाचार्य’-‘अर्जुन’ पुरस्काराने सन्मान

मुळचा कोल्हापूरचा असलेला पॅरीस ऑल्मपिक स्पर्धेतील कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे आणि प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरवण्यात आले. स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कार तर दीपाली देशपांडे यांना द्रौणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय ४ खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न, ३२ जणांना अर्जुन, २ जणांना जीवनगौरव श्रेणीतील अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ५ प्रशिक्षकांना द्रौणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये ३ नियमीत आणि २ जीवनगौरव श्रेणीतील द्रौणाचार्य पुरस्कार आहेत.

मनू भाकरसह ४ जणांना खेलरत्न

ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ विजेता डी. गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट खेळाडू प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मनू भाकरने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक जिंकले. १८ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने ११ डिसेंबर रोजी सिंगापूर येथे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक आणि २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये पुरुषांच्या उंच उडीत आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले.

मुरलीकांत पेटकर यांना जीवनगौरव श्रेणीतील अर्जुन पुरस्कार

जीवनगौरव श्रेणीतील अर्जुन पुरस्काराने २ खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यात जन्मलेले मुरलीकांत पेटकर यांचा समावेश आहे. ते भारताचे पहिले पॅरालंपिक सुवर्णपदक विजेते आहेत. जर्मनीतील हेडलबर्ग येथे ऑगस्ट १९७२ च्या पॅराऑलिम्पिकमधील त्यांनी वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. त्यांनी ५० मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत ३७.३३ सेकंदात विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. २०१८ मध्ये, त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबत ॲथलेटिक्स सुचा सिंग यांना हा पुरस्कार देण्यात आला.

इतर पुरस्कार

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार ‘फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया’ला प्रदान करण्यात आला. तर २०२४ ची मौलाना अबुल कलाम आझाद (एमएकेए) ट्रॉफी चंदीगड विद्यापीठाला प्रदान करण्यात आली.

अर्जुन पुरस्कार प्राप्त झालेल्या खेळाडूंची यादी

  1. ज्योती येराजी- ॲथलेटिक्स

  2. अन्नू राणी- ॲथलेटिक्स

  3. नितू- मुष्टियुद्ध

  4. स्वीटी- मुष्टियुद्ध

  5. वंतिका अग्रवाल- बुद्धिबळ

  6. सलीमा टेटे -हॉकी

  7. अभिषेक- हॉकी

  8. संजय- हॉकी

  9. जरमनप्रीत सिंग- हॉकी

  10. सुखजीत सिंग- हॉकी

  11. राकेश कुमार -पॅरा-तिरंदाजी

  12. प्रीती पाल- पॅरा-ॲथलेटिक्स

  13. जीवनजी दीप्ती- पॅरा-ॲथलेटिक्स

  14. अजित सिंग- पॅरा-ॲथलेटिक्स

  15. सचिन सर्जेराव खिलारी- पॅरा-ॲथलेटिक्स

  16. धरमबीर- पॅरा-ॲथलेटिक्स

  17. प्रणव सूरमा- पॅरा-ॲथलेटिक्स

  18. एच होकातो सेमा- पॅरा-ॲथलेटिक्स

  19. सिमरन- पॅरा-ॲथलेटिक्स

  20. नवदीप- पॅरा-ॲथलेटिक्स

  21. नितेश कुमार- पॅरा-बॅडमिंटन

  22. तुलसीमाथी मुरुगेसन- पॅरा-बॅडमिंटन

  23. नित्या सुमथी सिवन- पॅरा-बॅडमिंटन

  24. मनिषा रामदास- पॅरा-बॅडमिंटन

  25. कपिल परमार- पॅरा-जुडो

  26. मोना अग्रवाल- पॅरा-नेमबाजी

  27. रुबिना फ्रान्सिस- पॅरा- नेमबाजी

  28. स्वप्नील सुरेश कुसाळे- नेमबाजी

  29. सरबज्योत सिंग- नेमबाजी

  30. अभय सिंह- स्क्वॅश

  31. साजन प्रकाश- पोहणे

  32. अमन- कुस्ती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news