जन्माष्टमीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देशवासियांना शुभेच्छा

भगवान श्रीकृष्णाची शिकवण आत्मसात करूया
janmashtami
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या.(Image source- X)
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या. सर्व देशवासीयांसह परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही राष्ट्रपतींनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.

भगवान श्रीकृष्णाची शिकवण आत्मसात करूया

जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या की, 'मी माझ्या सर्व देशवासीयांना आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देते. जन्माष्टमीच्या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो. आनंदाचा हा सण आपल्याला भगवान श्री कृष्णाच्या आदर्शांसाठी स्वतःला समर्पित करण्याची प्रेरणा देतो. श्रीमद भगवद्गीता, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद हा संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणा आणि ज्ञानाचा चिरंतन स्त्रोत आहे. यानिमित्ताने आपण भगवान श्रीकृष्णाची शिकवण आत्मसात करूया आणि देशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी कार्य करण्याचा संकल्प करूया.'असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news