प्रशांत किशोरांनी केली जनसुराज पार्टीची औपचारिक घोषणा

पक्षाध्‍यक्षपदी मनोज भारती यांची निवड
Prashant Kishor
प्रख्‍यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज (२ ऑक्‍टोबर) आपल्‍या जनसुराज पार्टीची औपचारिक घोषणा केली.File photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रख्‍यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज (२ ऑक्‍टोबर) आपल्‍या जनसुराज पार्टीची औपचारिक घोषणा केली. 2 ऑक्टोबर 2022 रोजीपासून त्‍यांनी बिहारमध्ये जनसुराज मोहिमेअंतर्गत पदयात्रा सुरू केली होती. गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये त्यांनी बिहारमधील १७ जिल्ह्यांमध्ये पदयात्रा काढल्या. सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला पदयात्रेनंतर आज त्‍यांनी आपल्‍या राजकीय पक्षाची औपचारिक घोषणा केली आहे. मनोज भारती हे त्याचे पहिले अध्यक्ष आहेत. पक्षाच्या ध्वजात महात्मा गांधींसह भीमराव आंबेडकर यांचे चित्र लावण्यात येणार आहे.

प्रशांत किशोर यांनी दिला पाचसूत्री विकास मंत्र

पाटणा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पक्षाच्या औपचारिक घोषणा समारंभात प्रशांत किशोर यांनी बिहारसाठी पाच सूत्री विकास मंत्र दिला. यामध्ये युवक, शेतकरी, वृद्ध आणि महिलांसाठी विविध कृती आराखडा देण्यात आला. आपल्या भाषणात ते म्हणाले की, बिहारच्या जनतेला दिल्लीच्या मेहरबानीची गरज नाही. राज्‍यातील लोक इतके सक्षम होतील की ते इतर राज्यांना मदत करतील. बिहारमध्ये जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था लागू करण्यासाठी सरकार येताच ते तासाभरात दारूबंदी उठवतील, त्यानंतर दारूपासून मिळणारा कर केवळ शिक्षणावर खर्च होईल.

पाच हजार किलोमीटर पदयात्रा

प्रशांत किशोर यांनी स्‍पष्‍ट केले होते की, आपला जनसुराज पार्टी हा पक्ष कोणत्‍याही व्यक्ती, कुटुंब, जात किंवा वर्ग यांच्‍यासाठी नसून सर्वांसाठी असेल. नवीन बिहारचा प्रचार करायचा की पक्षाचा उद्देश? संघटनेने संपूर्ण बिहारमधील लोकांना पाटण्यात येण्याचे आवाहन केले होते. प्रशांत किशोर यांनी 2 ऑक्टोबर 2022 रोजी गांधी जयंतीनिमित्त पश्चिम चंपारण येथून जन सुराज यात्रेला सुरुवात केली होती. या माध्‍यमातून त्‍यांनी सुमारे 5000 किलोमीटर पदयात्रा केली. 17 जिल्हे, 2697 ग्रामसभा, 235 गट आणि 1319 पंचायतीमधून ही यात्रा पार पडली. आता इतक्या दिवसांच्या पदयात्रेनंतर राज्य पक्षाची घोषणा झाली आहे. पक्षाचे नेतृत्व मगास, अति मगास, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक आणि उच्च जाती या सर्व जाती समुदायातील लोकांच्या हातात असेल, असे प्रशांत किशोर यांनी यापूर्वी स्‍पष्‍ट केले आहे.

मनाेज भारती पक्षाचे पहिले अध्‍यक्ष

माजी राजदूत आणि मधुबनी जिल्ह्याचे रहिवासी मनोज भारती हे पक्षाचे पहिले अध्‍यक्ष असतील. तर मनोज जान सूरज हे पक्षाचे कार्यवाह अध्यक्ष असतील. अधिकृत ध्वजावर महात्मा गांधींसोबत बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचाही फोटो असेल.पक्षाच्‍या घटनेनुसार अध्‍यक्षांचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल. तसेच नेतृत्व परिषदेचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. पक्षातील उमेदवारांची निवड जनताच करेल. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना पसंत नसल्यास त्यांना रिकॉलच्या अधिकारांतर्गत काढून टाकले जाऊ शकते. बिहारमध्‍ये मार्च 2025 मध्ये विधानसभा निवडणुका होणार असून या निवडणुकीत प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष सत्ताधारी पक्षाला संयुक्‍त जनता दल आणि भाजप युती सरकारला आव्‍हान देणार आहे.

नोव्‍हेंबर २०२४ मधील पोटनिवडणुका लढवणार

आज पक्षाच्‍या औपचारिक घोषणेनंतर प्रशांत किशोर यांनी घोषणा केली की, "2024 मध्येच बिहारमधील इतर पक्षांचा हिशोब घेतला जाईल. नोव्हेंबर 2024 मध्ये बिहार विधानसभेच्या चार जागांवर पोटनिवडणूक प्रस्तावित आहे. जनसुराज पार्टी रामगढ, तारारी, बेलागंज आणि इमामगंज या जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे".

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news